Latest Marathi News | 9 लाख मतदारांचे Voter ID- Aadhar लिंकिंग; रावेर तालुका आघाडीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Linking Of aadhar & voter ID latest marathi news

Jalgaon : 9 लाख मतदारांचे Voter ID- Aadhar लिंकिंग; रावेर तालुका आघाडीवर

जळगाव : जिल्ह्यात मतदानकार्ड आधार क्रमांकाशी संलग्न (लिंक) करण्याच्या मोहिमेत दीड महिन्यात तब्बल ९ लाख मतदारांनी आधारकार्ड मतदान कार्डांशी संलग्न करून जागरूकता दाखविली आहे. ही मोहीम १ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. दीड महिन्यात या मोहिमेत आधार लिंक करण्यात रावेर तालुका आघाडीवर आहेत. या तालुक्यात १ लाख ३८ हजार ५७५ मतदारांनी आधारशी लिंकिंग केले आहे.

या मोहिमेत जळगाव शहर अद्यापही मागेच आहे. केवळ ३० हजार ८१९ मतदारांनी लिंकिंग केले आहे. निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र, विधी व न्याय मंत्रालयाने १७ जुलैला लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० मध्ये सुधारणा केली आहे. त्यानुसार मतदान कार्ड आधार कार्डाशी संलग्न करण्यात येत आहे.(Voter ID Aadhar linking of 9 lakh voters Latest Jalgaon News)

ऑनलाइनसोबत ऑफलाईन पद्धतीने ही मोहिम सुरू आहे. घरोघरी येणाऱ्या ‘बीएलओं’द्वारेही ही मोहिम राबविली जात आहे. ऑनलाइन पद्धतीने आधार लिंक करण्यासाठी अर्ज ६ ‘ब’ ईआरओएनईटी, जीएआरयुडीए ॲप, एनव्हीएसपी, व्हीएचपी या पोर्टलचा वापर करता येणार आहे. मतदाराचा आधार क्रमांक गोपनीय ठेवण्यात येणार आहे.

आधारकार्ड उपलब्ध नसल्यास मतदारांना नावाचे प्रमाणीकरण करण्यासाठी व दुबार नोंदी टाळण्यासाठी कोणतेही ओळखपत्र सादर करणे गरजेचे आहे. ऑफलाइन पद्धतीने ‘बीएलओं’कडे ओळखपत्र जमा करावयाची आहे. १ ऑगस्ट २०२२ ते १ एप्रिल २०२३ दरम्यान मतदान कार्डाला आधार लिंकिंगची मोहिम सुरू राहिल.

ऑनलाइन सेवा

मतदान कार्डाला आधार लिंक करणे ऐच्छिक असले तरी आधार लिंक करण्याने मतदाराला त्याच्या मोबाईलवर थेट मतदार लिस्ट, मतदान केंद्र व क्रमांक येईल, मतदान कार्डही तो ऑनलाइन काढू शकेल. सोबतच शासनाच्या विविध योजनांच्या माहितीचा संदेश पाठविला जाणार आहे. पूर्वी मतदान नोंदणी, दुरुस्ती, नाव काढणे, पत्ता बदल करण्यासाठी नमुना अर्ज १, २, २ अ, ३, ६, ७, ८, ११, ११ अ, ११ ब, १८, १९ वापरले जात होते.

आता नवीन बदलानुसार आधार संलग्न करण्यासाठी ६ ‘ब’ अर्ज निश्‍चित करण्यात आला आहे. घर स्थलांतर झाले, मतदार यादीतील दुरुस्तीसाठी ईपीक कार्ड बदलण्यासाठी, दिव्यांग मतदार चिन्हांकित करण्यासाठी नमुना अर्ज ८ वापरण्यात येणार आहे.

हेही वाचा: NMCच्या जागेवर खासगी इमारत; City Survey कार्यालयातूनही नोंदी गायब

आकडे बोलतात..

पुरुष मतदार--१७ लाख ९९ हजार १६१

महिला मतदार--१६ लाख ५५ हजार ३४३

तृतीयपंथी मतदार--१११

एकूण मतदार--३४ लाख ५४ हजार ६१५

विधानसभा मतदारसंघ --११

मतदार संघ--लिकिंग केलेले

चोपडा--७७ हजार ७५२

रावेर--१ लाख ३८ हजार ५७५

भुसावळ-८२ हजार ३९३

जळगाव शहर-३० हजार ८१९

जळगाव ग्रामीण--८७ हजार ९१

अमळनेर--७३ हजार ५

एरंडोल--८३ हजार ८१

चाळीसगाव--७७ हजार ८२०

पाचोरा--७० हजार २४१

जामनेर--८५ हजार ३५४

मुक्ताईनगर--९१ हजार २७

एकूण--८ लाख ९७ हजार १५७

हेही वाचा: सेनेच्या गडाला हादरा; प्रवीण तिदमे शिंदे गटात गेल्याने सिडकोत दिवसभर चर्चा

Web Title: Voter Id Aadhar Linking Of 9 Lakh Voters Latest Jalgaon News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..