NMCच्या जागेवर खासगी इमारत; City Survey कार्यालयातूनही नोंदी गायब

NMC News
NMC Newsesakal

नाशिक : गंगापूर रोडवरील आनंदवली शिवारात महापालिकेच्या जागेवर व्यावसायिक इमारत उभारण्याचा प्रकार समोर आल्यानंतर महापालिकेच्या नगररचना विभागाने संबंधितांना दुसरी नोटीस पाठवली. तर, दुसरीकडे सिटी सर्व्हे कार्यालयातूनदेखील नोंदी गायब झाल्याचा प्रकार समोर आल्याने या प्रकरणातील गूढ अधिकच वाढत चालले आहे. (Private building on NMC premises Records disappeared from City Survey office Nashik Latest Marathi News)

आनंदवली शिवारातील सर्व्हे क्रमांक ६७ हा महापालिकेच्या मालकीचा १८ गुंठे क्षेत्राचा भूखंड आहे. सातबारा उताऱ्यावरदेखील महापालिकेचे नाव लागले आहे. महापालिकेच्या भूखंडाला लागूनच सर्व्हे क्रमांक ६१ ब आहे. ३० मीटर रुंदीच्या रस्त्यावर असलेला हा भूखंड रोड वाइंडिंगमध्ये गेला आहे.

मात्र, असे असतानादेखील सर्व्हे क्रमांक ६१ ब वर इमारत उभी राहत असल्याचे दर्शविण्यात आले. परंतु, प्रत्यक्षात सदरची व्यावसायिक इमारत महापालिकेच्या भूखंडावर उभारण्यात आल्याचा आरोप माजी नगरसेवक अनिल चौघुले यांनी केला होता. यासंदर्भात महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे तक्रार केल्यानंतर तातडीने चौकशीचे आदेश देण्यात आले.

त्यानुसार नगर रचना विभागाने आर्चीत बिल्डर्सला दुसरी नोटीस पाठवली. दरम्यान, यासंदर्भात चौगुले यांनी गुन्हा घडला असताना नगररचना विभागाकडून नोटिशींचा सोपस्कार पार पाडला जात असल्याचा आरोप केला आहे. वास्तविक बांधकाम परवानगी रद्द करणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला.

NMC News
2 वर्षांनंतर वणीच्या जगदंबा मंदिरात हजारावर महिला भाविक घटी बसणार

शासनाच्या दप्तरातून नकाशे गायब

सर्व्हे क्रमांक ६७ या १८ गुंठे क्षेत्रफळ असलेल्या भूखंड महापालिकेचा असतानाच कागदावर मात्र सदरची जागा बांधकाम व्यावसायिकाचीच आहे, असे दर्शवून १६ कोटी रुपयांचे नुकसान करण्यात आले.

तर सदरच्या जागेवर व्यावसायिक इमारत बांधून ७५ कोटी रुपयांचा फायदा करून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. अर्चित बिल्डर्समार्फत महापालिकेच्या जागेवर इमारत उभारताना महापालिकेचा सर्व्हे नं . ६७ क्षेत्रफळ १८ गुंठे याची सिटी सर्वे नकाशावर नोंदच गायब केल्याचा आरोप चौगुले यांनी केला आहे.

NMC News
Crime : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून वन्यजीवांच्या अवयवांची विक्री!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com