
जळगाव : महापालिकेने शहरातील साफसफाईचा मक्ता वॉटरग्रेस कंपनीला दिला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून वॉटरग्रेस कंपनीत काम करणाऱ्या सफाई कर्मचारी, घंटागाडी चालकांना वेतन न मिळाल्यामुळे मंगळवारी (ता. २७) कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले होते.
दरम्यान, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसांत बिल अदा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर सकाळी दहाला घंटागाड्या प्रभागांमध्ये रवाना झाल्या. (Wages of cleaners pending After promising to pay the bill ghantagadi left jalgaon news)
हेही वाचा : जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'
वॉटरग्रेस कंपनीकडून शहरातील साफसफाई व कचरा वाहतुकीचे काम करण्यात येत आहे. त्यासाठी प्रतिटन कचरा संकलनासाठी ९४९.५० रुपयांप्रमाणे दर महापालिकेकडून वॉटरग्रेस कंपनीला अदा केले जातात. मात्र, महापालिकेकडून ऑक्टोबर महिन्याचे बिल वॉटरग्रेस कंपनीला अदा केले गेले नाही.
यामुळे वॉटरग्रेस कंपनीने आपल्या कामगारांचे वेतन दिले नाही. यामुळे सफाई कामगारांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मंगळवारी कामगारांनी शहरातील साफसफाईचे काम बंद ठेवून आंदोलनाचा पवित्रा घेतला होता.
मात्र, महापौर जयश्री महाजन, आयुक्त देवीदास पवार, आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त उदय पाटील, आरोग्याधिकारी डॉ. विकास पाटील यांनी कामगारांची भेट घेऊन दोन दिवसांत बिल अदा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर घंटागाड्या प्रभागात रवाना झाल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.