Viral | वेटरनेच मारला हॉटेलच्या पैशांवर डल्ला; चोरी करुन पसार

thieves looked in mirror and opened the door
thieves looked in mirror and opened the doorsakal

जळगाव : शहरातील ख्वाजा मियाँ दर्गाच्या मागील बाजूस नव्यानेच उघडलेल्या हॉटेज जयश्रीमधील वेटरने सव्वालाखांची चोरी केल्याची घटना घडली. सीसीटीव्ही तपासल्यावर त्यात वेटरने चोरी केल्याचे आढळून आले. हॉटेल मॅनेजरच्या तक्रारीवरून जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

सहकाऱ्याचा मोबाईलसुद्धा लांबवला

ख्वाजा मियाँ दर्गामागील रस्त्यावर कन्या शाळेच्या समोरच तीन महिन्यांपूर्वीच हॉटेल जयश्री सुरू झाली आहे. हॉटेलसाठी मनुष्यबळ उभे करण्यासाठी हॉटेल मालकांनी वेटर, स्वयंपाकी, मॅनेजर यांच्या राहण्याची सोय मागच्याच बाजूला केली आहे. रात्री हॉटेल बंद झाल्यावर सर्व कर्मचारी त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी निघून जातात. शुक्रवारी नेहमीच्या वेळेस हॉटेल बंद झाल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्याने कॅबीनमध्ये शिरून लॉकर तोडत आतमधील १ लाख ५ हजार ९३० रुपयांची रोकड लंपास केली. याच्यासह त्याच्यासोबत काम करणारा सहकारी जितेंद्र नथ्थुराम गोस्वामी याचा दहा हजारांचा मोबाईल चोरुन नेला. सकाळी हॉटेल उघडल्यावर चोरी झाल्याचे निदर्शनास आले.

thieves looked in mirror and opened the door
दुकान फोडून लांबविले 10 LED TV; वाढत्या चोऱ्यांचा नागरिकांना धसका

चोरटा सीसीटीव्हीत कैद

हॉटेल मॅनेजर शरद प्रकाश पवार सकाळी हॉटेलवर आल्यानंतर त्यांना घडला प्रकार आढळून आला. तत्काळ त्यांनी हॉटेल मालक आणि पोलिसांना घटना कळवली. हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आल्यावर ओम चतुर्वेदी (वय- २१, रा. हलवान पोस्ट बैराहना, सतना, मध्यप्रदेश) हा हॉटेलमध्ये कामाला असलेला वेटरच चोरी करताना आढळून आला. मॅनेजर शरद पवार यांच्या तक्रारीवरून जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास साहाय्यक फौजदार संतोष सोनवणे करत आहेत.

thieves looked in mirror and opened the door
जमीन विक्री प्रकरणात ७० लाखांची फसवणूक; तिघांविरूद्ध गुन्हा दाखल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com