जमीन विक्री प्रकरणात ७० लाखांची फसवणूक; तिघांविरूद्ध गुन्हा दाखल

Land Fraud
Land Fraud esakal
Updated on

मालेगाव (जि. नाशिक) : महानगरपालिका क्षेत्रातील सर्व्हे नं. २५ मधील एक हजार ६०० चौरस मीटर भुखंड खरेदीसाठी ७० लाख रुपयांचा सौदा करारनामा झाल्यानंतर पैसे घेऊनही त्रयस्थ व्यक्तीला मिळकत खरेदीखत देत हस्तांतर करुन ७० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मोहंमद हारुण अब्दुल मजीद (रा. अन्सार रोड) यांच्यासह तिघांविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात फसवणूक व ठकबाजीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Land Fraud
Aadhaar Card Fraud | फसवणूक टाळण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

अब्दुल मलीक अब्दुल गलील (वय ४२, रा. सुपर मार्केट) यांनी याप्रकरणी मोहंमद हारुण यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. अब्दुल मलीक यांनी त्यांच्या फर्मचे भागीदार हमीद सोहेल शेख, रेहान अब्दुल मुतल्लीब या तिघांनी १६०० चौरस मीटर बिनशेती खरेदीचा ७० लाखांचा सौदा करारनामा केला. त्यापोटी रोख व धनादेशाद्वारे ४२ लाख रुपये दिले असताना संशयिताने भुखंड मोजणी व लेआऊट करण्याच्या नावाखाली अब्दुल मलीक यांच्याकडून मुख्त्यारपत्र करुन घेत जमीन परस्पर खरेदी करुन दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली.

Land Fraud
जमीन नावावर करून अडीच कोटींची फसवणूक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Education expert Bhausaheb Chaskar urged immediate restructuring of the Teacher Eligibility Test to improve the quality of school education.
Tukaram Mundhe milk adulteration complaint
Who is Prashant Wadile?
MP Supriya Sule
Marathi News Esakal
www.esakal.com