esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

pravin mundhe

वेध नवरात्रोत्सवाचे अन्‌ पोलिस दल सावधान!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : नवरात्रोसत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्‍हा पोलिस दलातर्फे खबरदारीच्या उपाययोजना म्हणून विविध पोलिस ठाण्यांत मंडळ कार्यकर्त्यांच्या बैठका होत आहेत. जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दुर्गादेवी मंडळाच्या अध्यक्ष, तसेच पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीत शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या वतीने करण्यात आले

जिल्‍हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सार्वजनीक दर्गोत्सव साजरा करणाऱ्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात येत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्धारित केलेल्या निर्बंधांसह सूचनांचे काटेकोर पालन करण्याबाबत मंडळ कार्यकर्त्यांना सूचित करण्यात येत आहे. जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात झालेल्या बैठकीत पोलिस उपअधीक्षक चिंथा, निरीक्षक रामदास वाकोडे यांच्यासह जिल्हापेठ पोलिस ठाणे हद्दीतील दुर्गादेवी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

पोलिस उपअधीक्षक चिंथा यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याबाबत आवाहन केले. अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्यावी, वाद-भांडणाच्या प्रसंगी जवळील पोलिस ठाण्यात संपर्क करुरून तत्काळ माहिती द्यावी यासह विविध विषयांवर सूचना देण्यात येऊन मंडळ कार्यकर्त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. बैठकीला विविध नवदुर्गा मंडळांचे २० ते २५ पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या यशस्वितेसाठी जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे गोपनीय विभागाचे उमेश पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

पोलिस सावधान!

जिल्हाभरातील संवेदनशील गाव-तालुक्यांवर पोलिस दलाचे विशेष लक्ष राहणार असून, अतिरिक्त पोलिस बल त्यासाठी तैनात करण्यात येणार आहे. साडेतीन हजार पोलिस कर्मचाऱ्यांसह अधिकारी, होमगार्ड जवानांसह महिला कर्मचारी बंदोबस्तकामी तैनात करण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन झल्यास तत्काळ कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.

loading image
go to top