Latest Marathi News | थंडी सुरू होताच उबदार कपडे खरेदीसाठी ग्राहकांची होतय गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Citizens while buying sweaters

Jalgaon : थंडी सुरू होताच उबदार कपडे खरेदीसाठी ग्राहकांची होतय गर्दी

जळगाव : अधिक पावसामुळे थंडीचा जोर यंदा वाढणार आहे. यामुळे यंदा फटाके विक्रेत्यांची दुकाने खाली होताच, स्वेटर विक्रेत्यांनी जी. एस. मैदानावर स्वेटर विक्रीची दुकाने थाटली आहेत. स्थानिक विक्रेत्यांसह तिबेटियन बांधवांनी दुकाने थाटल्याने ग्राहकांना स्वेटर, मफलर, जॅकेटचे अनेक प्रकार पाहावयास मिळतील.

आता थंडीला सुरवात झाली आहे. यामुळे स्वेटरचे दर सध्या कमी आहेत. मात्र जसजशे थंडीचे प्रमाण वाढेल तशी दरात वाढ होण्याची शक्यता असल्याचे स्वेटर विक्रेत्यांनी सांगितले.(Winter Season Start and customers rush to buy warm clothes Jalgaon News)

हेही वाचा: Winter Season : सर्दी,खोकल्याचे रुग्ण वाढले; 3 दिवसांत 200 रुग्णांची तपासणीची नोंद

स्वेटरमध्ये हाफ स्वेटर (अर्धबाही), पूर्ण स्वेटर, शर्टाच्या आत घालावयाचे स्वेटर, महिला व मुलींचेही स्वेटवर वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध आहेत.

मफलर बांधण्याची प्रथा काहीअंशी बंद होऊन आता कानपट्टयाला अधिक मागणी आहे. स्वेटरऐवजी गरज जॅकेटला सर्वाधिक मागणी आहे. सातशे-आठशे रुपयांपासून पाच हजारांपर्यत जॅकेटचा दर असल्याचे विक्रेता सोनू यादव यांनी सांगितले.

हेही वाचा: Jalgaon : कन्येच्या विवाहाला ‘संस्कारा’ ची जोड; सोहळ्याच्या खर्चातून गोसेवेचा संकल्प