Jalgaon : कन्येच्या विवाहाला ‘संस्कारा’ ची जोड; सोहळ्याच्या खर्चातून गोसेवेचा संकल्प

Cowshelter
Cowshelteresakal

जळगाव :

स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला

स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया..

परमपूज्य जी वंद्य या भारताला

नमस्कार त्या दिव्य गो देवतेला..॥

या शब्दात गोमातेची महती वर्णिली आहे.. पण, केवळ या स्तुतीपुरते मर्यादित न राहता काही दातृत्वाचे हात खऱ्या अर्थाने गोमातेच्या सेवेत समर्पित असल्याचा अनुभव येतो, तेव्हा अशा हातांसमोर आपसुकच आपले कर जुळतात.

अमर कुकरेजा.. खरंतर हे नाव जळगाववासीयांना अपरिचित नाहीच. एक यशस्वी व्यावसायिक म्हणून त्यांचा लौकिक. नवरंग चहाचा ब्रॅन्ड त्यांनी खानदेशातच नव्हे, तर राज्यात रुजवलाय. ही झाली त्यांची व्यावसायिक ओळख. मुळात ते अत्यंत मितभाषी, धार्मिक आणि विशेषत: गोसेवक, गोपूजकही. त्यांच्या गोसेवेचा सध्या प्रत्यय येतोय, त्याला औचित्य ठरलेय, त्यांच्या कन्येच्या विवाहाचे...(Motivational Story Amount of daughter Marriage ceremony donate to Cowshelter by amar kukreja Jalgaon News)

Cowshelter
Bhaubeej Special : राजकीय मतभेद,त्यापलिकडे नाते अभेद्य

विवाह... एक संस्कार

विवाह हा हिंदू संस्कृतीतील सोळा संस्कारांपैकी एक महत्त्वपूर्ण संस्कार मानला जातो. विवाहाला संस्कार मानून तो पार पाडण्याची परंपरा आजही कायम आहे. या परंपरेचा भाग म्हणून अमर कुकरेजा यांनी त्यांच्या कन्येच्या विवाहपूर्व मंगल सोहळ्यालाच संस्कार अन्‌ परंपरेची जोड दिली.

गोशाळेच्या विकासाचा संकल्प

अमरभाईंची कन्या अंकिताचा विवाह जालना येथील संदेश यांच्याशी येत्या ६ नोव्हेंबरला आणंद (गुजरात) येथे होत आहे. त्यानिमित्त जळगावात रविवारी (ता.३०) कुकरेजा परिवाराकडून विवाहपूर्व मंगल समारोह झाला. मात्र, कुकरेजा यांनी या सोहळ्यात बडेजाव, त्यावर अनाठायी खर्च न करता त्यातून गोसेवा केंद्राला सर्व सुविधांनी युक्त आधुनिक गोशाळेत निर्मितीचा संकल्प करत तो पूर्णत्वासही नेला. शिरसोली मार्गावर अनुभूती स्कूलच्या मागे संत सतरामदास गोदडीवाला घन:श्‍याम गोशाळास्थित आहे. धामचा परिसर १० एकरचा. त्यात सुमारे एक एकर परिसरात १९८५ पासून गोशाळा आहे. सद्य:स्थितीत येथे ५५ गायी असून, त्यांची नित्यसेवा सुरू आहे.

कुकरेजा यांनी गोशाळेसाठी भव्य संरक्षक भिंत बांधली. गायींना पिण्याच्या पाण्यासाठीचे दोन हौद दुरुस्त करुन त्यात कायमस्वरूपी स्वच्छ व शुद्ध पाणी राहील, याची व्यवस्था केली. तसेच आजारी गायींसाठी वेगळा गोठाही बांधला. गायींना बंदिस्त वाटू नये, अशा स्वरुपाची केंद्राची रचना केली. मोकळी हवा, प्रकाश राहील असे गोठ्याचे संपूर्ण नूतनीकरण, रंगरंगोटी आदी कामे प्रगतिपथावर आहेत. हे स्थळ केव गोशाळा म्हणून न राहता रम्य, पवित्र स्थळ व्हावे म्हणूनही त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

Cowshelter
Jalgaon : भाऊबीजेला बहिणीकडे गेलेल्या भावाचा बुडून मृत्यू

मातृ, गोमातावंदन सोहळा

अमरभाईंच्या मातोश्री श्रीमती अमनीबाई वयाची ७५ वर्षे पूर्ण करत आहेत. त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त मातृवंदन आणि कन्येच्या विवाह सोहळ्यानिमित्त गोमाता वंदन असा दुहेरी योग यानिमित्ताने कुकरेजा परिवारात जुळून आलाय. मातोश्री व कन्या अंकिता यांच्या हातून गोदानाचा उपक्रमही रविवारी (ता. ३०) राबविण्यात येणार आहे. असा हा आगळा गोसेवा संकल्प खऱ्या अर्थाने समाजासाठी प्रेरणादायी असाच आहे.

"अंकिताचा विवाहपूर्व मंगल सोहळा गोपूजन, गोसेवेच्या माध्यमातून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला. स्वत: अंकितासह परिवारातील सर्वच सदस्यांना तो आवडला. आर्किटेक्ट असल्याने अंकिताने गोशाळा नूतनीकरणाच्या कामात स्वत: सहभाग घेतला. कन्येचा विवाह हा प्रत्येक पित्याच्या आयुष्यातील अत्यंत भावनिक प्रसंग असतो. त्याला गोसेवेच्या संस्काराची जोड देऊन त्यातून जे समाधान मिळतेय, ते अतुलनीय आहे."

- अमर कुकरेजा

Cowshelter
Jalgaon : अहो आश्चर्यम..! आनंदाचा शिध्याचे मध्यरात्रीपर्यंत वाटप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com