जळगाव : माहेरवाशिणीचा हुंड्यासाठी छ्ळ; गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dowry

जळगाव : माहेरवाशिणीचा हुंड्यासाठी छ्ळ; गुन्हा दाखल

वरणगाव (जि. जळगाव) : येथील माहेर असलेल्या विवाहितेचा सासरकडील मंडळींनी १५ लाख रुपयांसाठी छळ केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (women persecuted for dowry case filed Jalgaon News)

वरणगाव येथील माहेर असलेली बुशरा खान हुज्जपा शेख (वय २०) हिचा विवाह रावेर येथील हुज्जपा रईस शेख याच्याशी २० नोव्हेंबर २०२० ला मुस्लिम रीतिरिवाजाप्रमाणे (Muslim Rituals) झाला. विवाहितेस सहा महिन्यांची मुलगी असून, पती खासगी रुग्णालयात नोकरीत होता. काही दिवस संसार सुरळीत सुरू असताना पतीने दवाखाना टाकण्यासाठी पत्नी बुशरा खान हिला वडिलांकडून १५ लाख रुपये आणावे, यासाठी मानसिक व शारीरिक त्रास देणे सुरू केले. त्यानंतर तिला वडिलांकडे सोडून दिले. तसेच हुज्जपा शेख ईदनिमित्त (Ramzan Eid) वरणगावला आला असता तो तीन वेळा तलाक म्हणून निघून गेला असून, राष्ट्रीय तीन तलाक कायदा (National Triple Talak Law) बंदीचेही त्याने उल्लंघन केले आहे.

हेही वाचा: Jalgaon : लोक अदालतीत 41 लाखांची वसुली

या प्रकरणी पती हुज्जपा शेख यांच्यासह, सासरे रईस शेख नियाज मोहम्मद, दीर तला शेख रईस शेख, आदीश शेख, नणंद सना शेख अझहर, नंदोई अझहर शेख यांच्याविरुद्ध फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरिक्षक आशिषकुमार आडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी नावेद अली तपास करीत आहेत.

हेही वाचा: जळगाव : बंद जलवाहिनीतून हजारो लिटर पाण्याची नासाडी

Web Title: Women Persecuted For Dowry Case Filed Jalgaon News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top