Jalgaon News : चाळीसगावात रस्ताप्रश्‍नी पालिकेवर मोर्चा; शास्त्रीनगर-खरजई नाक्यापर्यंतचे काम रखडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Citizens besieging the municipal officials and demanding answers regarding the stalled work on the road.

Jalgaon News : चाळीसगावात रस्ताप्रश्‍नी पालिकेवर मोर्चा; शास्त्रीनगर-खरजई नाक्यापर्यंतचे काम रखडले

चाळीसगाव (जि. जळगाव) : शहरातील शास्त्रीनगरजवळील हॉटेल दयानंद (मुन्शी भंगारवाला) ते खरजई नाक्यापर्यंत मुख्य रस्त्याचे काम गेल्या सहा महिन्यांपासून रखडल्याने परिसरातील रहिवा‍शांसह व्यावसायिक, वाहनधारक यांनी नगरपालिकेवर मोर्चा नेऊन संबंधित अधिकाऱ्यांना शुक्रवारी (ता. ३)जाब विचारला.

तसेच काम लवकर सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. (work up to Shastrinagar Kharjai bridge was stopped in chalisgaon jalgaon news)

या रस्त्यावर २५ ते ३० टक्के काँक्रिटीकारण झाले असून, इतर ७५ टक्के रस्त्यावर फक्त खडी टाकलेली दिसत आहेत. रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहने जात असतात, वाहन जात असताना टाकलेली खडी पादचारी रहिवाशांच्या अंगावर उडते, त्यामुळे लहान-मोठे अपघात नित्याचेच झाले आहे.

तसेच वाहन जात असताना उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. असे असताना कामात सुधारणा झाली नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.

या रस्त्याच्या कामात सुधारणा व्हावी व चांगल्या प्रतीचे काम झाले पाहिजे, अशीही मागणी निवेदनात केली आहे. निवेदनावर हरीश चौधरी, अशोक चौधरी, निखिल रावते, देवा वाबळे, दीपक चौधरी, सुभाष चौधरी, दिनेश खैरनार, सागर चौधरी, विनोद परदेशी, दीपक देशमुख, जगन्नाथ मालपुरे, भूषण रावते, गौरव येवले, प्रसाद चित्ते, स्वप्नील वेळीस, संदीप परदेशी, गुलाव शिंपी, हिरालाल चौधरी आदींचा समावेश आहे.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

या रस्त्याच्या कामाची किंमत २ कोटी १५ लाख रुपये असून, कामाचे भूमिपूजन आठ महिन्यांपूर्वी थाटामाटात झाले. कामाला सुरवातही झाली. या रस्त्याचे काँक्रिटीकारण वेगात होईल, असे वाटत होते. मात्र, केवळ २५ ते ३० टक्केच काम अद्यापपर्यंत होऊन शकले आहे.

इतर ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा खडी पडलेली आहे. या रस्त्यावरून भडगाव- पाचोरा रस्त्यावरील गावे, तसेच तालुक्यातील २५ टक्के गावांतील रहिवाशांचा, वाहनांचा वापर, चाळीसगाव व बाजार समिती, घाटरोडकडे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वाहनांचा शास्त्रीनगर, टाकळी प्र. चा., ओझर, पातोंडा, वाघळी, कजगाव, बहाळ, टेकवाडे, खेडगाव, गुढे, आदी महत्त्वाच्या गावातील रहिवाशांचा वापर होत आहे.