Jalgaon News : चाळीसगावात रंगल्या कुस्त्यांच्या दंगली; उत्तर महाराष्ट्रातील मल्लांचे उत्कृष्ट प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kusti

Jalgaon News : चाळीसगावात रंगल्या कुस्त्यांच्या दंगली; उत्तर महाराष्ट्रातील मल्लांचे उत्कृष्ट प्रदर्शन

चाळीसगाव (जि. जळगाव) : येथील रघुवीर व्यायाम प्रसारक मंडळ व (कै.) कोंडाजी वस्ताद व्यायाम शाळातर्फे दरवर्षाप्रमाणे यंदाही उर्दू शाळेच्या पटांगणावर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कुस्त्यांचे सामने रंगले. (Wrestling riots in Chalisgaon excellent display of wrestlers from North Maharashtra Jalgaon News)

याप्रसंगी जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष व माजी आमदार राजीव देशमुख, आमदार मंगेश चव्हाण, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, पोलिस निरीक्षक संदीप पाटील आदींच्या हस्ते मुख्य कुस्त्या लावण्यात आल्या. कुस्ती सामन्यामध्ये जळगाव, धुळे, नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून आलेल्या पहिलवानांनी कुस्तीचे चांगले प्रदर्शन केले व अनेक मल्लांनी हजेरी लावून रोख बक्षीसे मिळविले.

तत्पूर्वी, सुरवातीला आखाडापूजन व्यायामशाळेचे अध्यक्ष व तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष अक्षय अग्रवाल, आ. बं. मुलांच्या शाळेचे चेअरमन योगेश अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी व्यायामशाळेचे उपाध्यक्ष शेख गफूर, खजिनदार जुगलकिशोर अग्रवाल, माजी मल्ल शांताराम हडपे, रावसाहेब पाटील, मधूर अग्रवाल, संजय देशमुख, चाळीसगाव विकासोचे अध्यक्ष प्रदीप देशमुख आदी उपस्थित होते.

कार्यक्रमास माजी नगरसेवक रामचंद्र जाधव, अण्णा कोळी, श्याम देशमुख, राजेंद्र चौधरी, अहिरे, चंदू तायडे, दीपक पाटील, भगवान पाटील, प्रभाकर चौधरी, मानसिंग राजपूत तसेच महानंदाचे संचालक प्रमोद पाटील, जिल्हा परिषद सदस्य शशिकांत साळुंखे, राष्ट्रीय सहकारी शिक्षण मंडळाचे संचालक बारकू वाघ, युवराज वाघ, ‘चाळीसगाव एज्युकेशन’चे उपाध्यक्ष मिलिंद देशमुख, संचालक ॲड. प्रदीप अहिरराव, धन्वंतरी नागरी पतसंस्थेचे संचालक डॉ. संदीप देशमुख, प्राचार्य डॉ. एस .आर .जाधव, माजी सभापती अजय पाटील व संजय पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

पंच म्हणून दिलीप गायकवाड, भिला आगोणे, सुरेश गायकवाड, सुभाष गायकवाड, युवराज वाघ यांनी काम पाहिले तर कुस्ती सामने यशस्वितेसाठी जिभाऊ येवस्कर, प्रल्हाद आगोणे, रमेश रोकडे, बी. बी. सोनवणे, एम. बी. लाड, दिलीप वाघ यांनी सहकार्य केले. रघुवीर व्यायामशाळेचे सचिव रमेश जानराव यांनी सूत्रसंचलन केले.

आखाड्यातील विजयी मल्ल

विकी पाटील (पोहरे), देविदास गुजर (आमडदे), जगदीश कोळी (धुळे), वेदांत आगोणे, (चाळीसगाव), अफ्तार शेख (सायगाव), विजय गवळी (मालेगाव), दोधा माळी (करंजगाव), भय्या पाटील (धुळे), संदीप बछ्ये यांच्यासह अनेक मल्लांनी उत्कृष्ट खेळ करून प्रेक्षकांची दाद मिळविली.