फायनान्स कंपनीच्या छळाला कंटाळुन शेतकऱ्याच्या मुलाची आत्महत्या

कोरपावली येथील संजय ऊर्फ बाळू रमेश महाले यांच्यावर एका खासगी फायनान्स कंपनीचे कर्ज होते.
Suicide
Suicideesakal
Updated on

यावल (जि. जळगाव) : तालुक्यातील कोरपावली येथील ३८ वर्षीय शेतकऱ्याच्या तरुण मुलाने स्वतः व वडील कर्जबाजारी असल्याने विष घेतले. ही घटना १२ जूनला घडली. दरम्यान, उपचार सुरू असताना या तरुणाचा गुरुवारी (ता. १६) रात्री मृत्यू झाला.

कोरपावली येथील संजय ऊर्फ बाळू रमेश महाले (वय ३८) याच्यावर एका खासगी फायनान्स कंपनीचे कर्ज होते. तसेच त्याच्या वडिलांवर देखील बँकांचे कर्ज आहे. हा कर्जाचा डोंगर कसा पेलवला जाणार, या चिंतेपायी राहत्या घरात १२ जूनच्या रात्री विष प्राशन केले. कुटुंबीयांच्या लक्षात ही बाब आल्याने त्यास तत्काळ जळगाव येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. दरम्यान, उपचारा सुरू असताना गुरुवारी (ता. १६) जूनला त्याचा मृत्यू झाला. याबाबत पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत संजयच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे.

Suicide
वीज तारांनी घेतला तरुणाचा बळी; अभियंत्यासह वायरमन विरोधात गुन्हा
Suicide
5 वर्षीय मुलाला मारून आईचीही आत्महत्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jalgaon Engineer Incident
Jalgaon Mother and Son Case
Girna Dam Water Storage
Ganesh Idol Broken News
Marathi News Esakal
www.esakal.com