
कंटेनरखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यु
जळगाव : कंटेनरच्या चाकाखाली आल्याने दुचाकीस्वार नाना नथ्थू माळी (वय ४०, रा. पाळधी) जागीच ठार झाले. ही घटना राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल मराठासमोर घडली. अपघातात दुचाकीस्वाराला वाचविण्याचा नादात कंटेनर चालकाने नियंत्रण सुटून मागचा भाग कॅबीनपासून तुटला व तो रस्त्याच्या कडेला चारीत कोसळला. अपघातामुळे महामार्गावर काहीकाळ वाहतूक कोंड झाली होती.
पाळधी (ता. जळगाव) येथील फुलेनगरातील नाना माळी ट्रॅक्टवर चालक म्हणून काम करतात. काही कामानिमित्त नाना माळी एकासोबत त्यांच्या दुचाकीवरून (MH19, DQ8749) जळगावाला आले होते. काम आटोपून ते घरी परतत असताना, राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल मराठासमोर एका दुचाकीचा नाना माळी यांच्या दुचाकीला कट लागला. यात चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी समोरून येणाऱ्या कंटनेरच्या (RJ01GB6465) समोर आली. दुचाकी अचानक समोर आल्याने कंटनेरचालकाने दुचाकीस्वारांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुचाकीच्या मागे बसलेले नाना माळी कंटेनरच्या चाकाखाली येऊन चिरडले गेले आणि ते जागीच ठार झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ असा परिवार आहे.
दरम्यान, कंटनेरचालक घनश्याम मगनलाल माळी (रा. कोचील, ता. किसनगड, जि. अजमेर, राजस्थान) फ्लोरींग स्टाईल घेऊन गुजरातवरून हैदराबादला जात होता. त्यांच्या कंटेनरखाली दुचाकीस्वाराचा चिरडला गेला. घटनास्थळी जमाव जमल्याने पोलिसांनी कंटनेरचालकाला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात रवाना केले.