Latest Marathi News | कंपनीत कामावर जाणाऱ्या तरुणाला मारहाण करत लुटले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Beating

Jalgaon : कंपनीत कामावर जाणाऱ्या तरुणाला मारहाण करत लुटले

जळगाव : एमआयडीसी चटई कंपनीत कामावर निघालेल्या जितेंद्र भास्कर काळे (वय ३६, रा. विनायकनगर) यांचे वाहन अडवून लूटमार केल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. या प्रकरणी बुधवारी गुन्हा दाखल झाल्यानंतर गुरुवारी (ता. ६) तिघा चोरट्यांना एमआयडीसी पोलिसांनी सुप्रीम कॉलनी परिसरातून अटक केली.

कानळदा रेाडवरील रहिवासी जितेंद्र भास्कर काळे एमआयडीसीत चटई कामाला आहेत. सोमवार (ता. ३) सायंकाळी दुचाकीने कंपनीत कामावर जात असताना किरण पाइप कंपनीजवळ रस्ता अडवून ट्रिपलसीट भामट्यांनी मारझोड करत त्यांच्या खिशातून पाच हजार रुपयांचा मोबाईल व पाकिटातील तीन हजारांची रोकड बळजबरीने काढून घेतली.(Young man going to work company beaten robbed Jalgaon Crime news)

हेही वाचा: Crime News : पतीशी भांडणानंतर घर सोडलेल्या पीडितेवर बिहारमध्ये अत्याचार

लूटमार केल्यावर कुणाला काही सांगितले तर ठार करू, अशी धमकी देऊन तेथून पोबारा केला. पळून जाताना जितेंद्रने लुटारूंच्या वाहना (एमएच१९ डीपी ४८१२)चा क्रमांक लक्षात ठेवत थेट एमआयडीसी पोलिस ठाणे गाठत तक्रार केली होती.

सुप्रीम कॉलनी परिसरातून अटक

गुन्हातील तिघे संशयित चोरटे सुप्रीम कॉलनी परिसरातील जंगलात लपून बसल्याची गुप्त माहिती निरीक्षक प्रतापसिंह शिकारे यांना मिळाल्यावर त्यांच्या पथकातील उपनिरीक्षक नीलेश गोसावी, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, किशोर पाटील, नाना तायडे, मुकेश पाटील, इमरान सय्यद, सुधीर साळवे, संदीप धनगर, सचिन पाटील, साईनाथ मुंडे यांच्या पथकाने सुप्रीम कॉलनी परिसरात दडून बसलेल्या योगेश विजय जाधव, सुनील भागवत कोळी, करण जसबीरसिंग संधू यांना अटक केली.

हेही वाचा: MLA Suresh Bhole : 10 रस्त्यांची कामे एकाच वेळी सुरू करा!