Larest Marathi News | पतीशी भांडणानंतर घर सोडलेल्या पीडितेवर बिहारमध्ये अत्याचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime news

Crime News : पतीशी भांडणानंतर घर सोडलेल्या पीडितेवर बिहारमध्ये अत्याचार

जळगाव : कौटुंबिक वादातून पतीसोबत कडाक्याचे भांडण होऊन २९ वर्षीय विवाहिता घर सोडून निघून जात असताना सोबत काम करणाऱ्या एकाने तिला बिहारमध्ये बोलवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली. एमआयडीसी पोलिस ठाण्यात राजेशकुमार जयनारायण पासवान (रा. बिहार) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असलेल्या दांपत्यात वादविवाद सुरू होते. कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी म्हणून पीडिता औद्योगिक वसाहतीत एका मिलमध्ये कामाला जात होती. तेथे कामावर असलेल्या राजेशकुमार पासवान याने तिच्याशी सलगी करून मोबाईल क्रमांकाची देवाणघेवाण केली.(Victim who left home after quarrel with husband abused in Bihar Jalgaon crime news)

हेही वाचा: Cyber Crime News : Instagramवर मैत्री करुन ग्रामीण तरुणीला सहा लाखांचा गंडा

नंतर दोघेही एकमेकांशी बोलू लागले होते. गेल्याच महिन्यात (२ सप्टेंबर) राजेशकुमार नोकरी सोडून त्याच्या गावी बिहारमध्ये निघून गेला. पीडिता व तिच्या पतीमध्ये कडाक्याचे भांडण झाल्याने पतीने तिला माहेरी निघून जाण्यास सांगितल्याने तिने घर सोडले.

तिने राजेशकुमारला फोनवरून संपर्क साधून घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. त्याने पीडितेला त्याच्या गावी येऊन जा, असे सांगत बिहारमध्ये बोलावून घेतले. पीडिता बिहारमध्ये पोचल्यानंतर राजेशकुमारने पीडितेला एका कंपनीमधील खोलीत सोडले. नंतर रात्री त्याने पीडितेवर अत्याचार केला. भोपाळ येथे मित्राच्या घरी नेऊन पुन्हा अत्याचार करून तिला धमकावून पळवून लावले.


छायाचित्र, व्हिडिओने ब्लॅक मेलिंग

पतीने हाकलून लावले म्हणून पीडितेने राजेशकुमार या भामट्याला मदत मागितली. त्याने मदत तर केलीच नाही उलट पीडितेचे लचके तोडून तिला अनोळखी बिहार राज्यात एकटीला पिटाळून लावले. मिळेल त्या वाहनाने पीडितेने भडगाव तालुक्यातील माहेर गाठून बेतलेला प्रसंग कुटुंबीयांना सांगितला. अशातच १९ सप्टेंबरला राजेशकुमारने विवाहितेला फोन करून तिचे फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. अखेर राजेशकुमारच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने भडगाव पोलिसांत तक्रार दिली. ती तक्रार शून्य क्रमांकाने एमआयडीसी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आली असून, अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: Jalgaon : पावणेतीन लाख शेतकऱ्यांनी केली ऑनलाईन ई-पीक नोंदणी