Latest Marathi News | खाकीच्या सतर्कतेमुळे वाचले युवकाचे प्राण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police Save young man life

Jalgaon : खाकीच्या सतर्कतेमुळे वाचले युवकाचे प्राण

पाचोरा : येथील पोलिस ठाण्यात नियुक्त असलेल्या राहुल बेहरे व विश्वास देशमुख या पोलिस कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे प्राण वाचले असून, या युवकास पाण्यातून काढून उपचार करून आईच्या स्वाधीन करण्यात आले. या कामगिरीमुळे बेहेरे व देशमुख यांचे कौतुक होत आहे.

येथील शहरालगतच्या वसाहतीत राहणारी महिला गुरुवारी (ता. २७) पोलिस ठाण्यात आली व माझ्या मुलाने मोबाईलवर आत्महत्या करीत असल्याचा मेसेज पाठवला असून, तो तणावात असल्याने आत्महत्या करेल, असे सांगत तिने टाहो फोडला.(Young Man Jump in dam because of stress city police save his life Jalgaon News)

हेही वाचा: Jalgaon : दिवाळीच्या सुटीनिमित्त अजिंठा लेणी ‘Housefull’

या वेळी पोलिस ठाण्यातील राहुल बेहरे, विश्वास देशमुख यांनी हा मेसेज आपल्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर प्रसारित केल्यानंतर अवघ्या काही मिनिटात या पोलिस कर्मचाऱ्यांना बिल्दी धरणाच्या पुलाजवळ एक संशयित युवक फिरत असल्याचा मेसेज मिळाला.

त्यांनी संबंधित मेसेज पाठविणाऱ्याला मोबाईलवर तुम्ही तिथेच थांबा आम्ही पोहोचतो, असे सांगत ते बिल्दी धरणाकडे निघाले. दरम्यान, या युवकाने धरणात उडी मारली. त्यास पप्पू मोरे, सुकलाल भिल, बापू सोनवणे यांनी पाण्याबाहेर काढले. तोपर्यंत बेहरे व देशमुख घटनास्थळी पोचले. त्यांनी या युवकास रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू केल्याने हा युवक वाचला. त्याची प्रकृती सुखरूप झाल्यावर त्यास आईच्या स्वाधीन करण्यात आले.

हेही वाचा: Jalgaon Crime Update : निवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या घरात 8 लाखांवर डल्ला