Latest Marathi News | निवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या घरात 8 लाखांवर डल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police officers tracking thieves with dog squad

Jalgaon Crime Update : निवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या घरात 8 लाखांवर डल्ला

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : खेडी खुर्द (ता. चाळीसगाव) येथील निवृत्त उपविभागीय पोलिस अधिकाऱ्याच्या घरातून चोरट्यांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह आठ लाख २० हजारांचा ऐवज लंपास केला. घटनेनंतर श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते.

खेडी खुर्द येथील धनराज पाटील हे निवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी असून, त्यांच्या पत्नीसमवेत ते येथे राहतात. धनराज पाटील व त्यांची पत्नी, मुलगा मुकेश पाटील गुरुवारी (ता. २७) सकाळी साडेअकराच्या सुमारास स्वत:च्या कारने औषधोपचारासाठी औरंगाबाद येथे गेले होते.(8 lakhs in theft by thieves house of a retired police officer Jalgaon Crime News)

हेही वाचा: Jalgaon Crime News : वृद्धेचे गळ्यातील मंगळसूत्र लंपास

दवाखान्याचे काम आटोपून शुक्रवारी (ता. २८) रात्री साडेआठच्या सुमारास औरंगाबाद येथून खेडी खुर्द येथे आपल्या घरी खेडी खुर्द येथे परत आल्यावर मुलगा मुकेशने आपल्याजवळील चावीने कुलपाला लावली असता चावी कुलपात गोल फिरत असल्याने उघडले नाही. शेवटी कुलूप तोडले.

कपाटातून दागिने गायब

घरात प्रवेश करताच मुकेशची आई कुसुम पाटील यांना बेडरूमध्ये असलेले कपाट उघडे दिसले. त्यांनी आरडाओरड केली व मुकेशने आत जाऊन पाहिले असता त्याला कपाटातील लॉकर तुटलेले दिसले. त्याचबरोबर कपाटात ठेवलेल्या बॅगांच्या चैनी उघडलेल्या दिसल्या व त्याचबरोबर स्वयंपाक घरातील कपाटाचे लॉकर तुटलेले दिसले. कपाटातील दागिने चोरीस गेल्याने एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा: Jalgaon Crime Update : एकाच रात्री 5 दुकाने फोडली; पोलिसांसमोर चोरांचे खुले आव्हान

या चोरीमध्ये दोन लाख रुपयाचे ४० ग्रॅमची सोन्याची साखळी, दोन लाखांची ४० ग्रॅम वजनाची सोन्याची मोहनमाळ, तीन लाखांच्या ६० ग्रॅम वजनाच्या चार बांगड्या, ५० हजार रुपयांचे दहा ग्रॅमच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, ६० हजारांच्या चार अंगठ्या १२ ग्रॅम वजनाच्या व दहा हजारांची रोकड असा आठ लाख २० हजार रुपयांचा ऐवज लंपास झाला. चोरट्यांनी दागिन्यांच्या चोरीबरोबर प्रॉपर्टीचे तसेच इन्शुरन्सचे व बँकेचे पासबुक, एटीएम कार्डदेखील सोबत नेले आहे. या प्रकरणी मेहुणबारे पोलिस ठाण्यात मुकेश पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला. उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके तपास करीत आहेत.

श्वानपथकाला पाचारण

घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी अभयसिंग देशमुख यांनी भेट देऊन पाहणी केली. या घटनेचे गांभीर्य ओळखून जळगाव येथून श्वानपथक व ठसेतज्ज्ञ यांना पाचारण करण्यात आले होते. या वेळी मेहुणबारे पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके, धर्मराज पाटील, अन्वर तडवी आदी उपस्थित होते.

हेही वाचा: Agriculture Update Jalgaon : ‘ओला दुष्काळ’ साठी पवारांना साकडे