
Jalgaon Crime News : मोबाईल सापडल्यावरून तरुणाला मारहाण
जळगाव : मोबाईल सापडल्यावरून दोन भावांनी आनंद श्रीकृष्ण जंजाळे (रा. समतानगर) या तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.ही घटना सोमवारी (ता. २८) रात्री आठच्या सुमारास समतानगरात घडली. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
लताबाई श्रीकृष्ण जंजाळे कुटुंबासह समतानगर वास्तव्यास असून, सोमवारी रात्री आठला त्यांना समतानगरातील पाणी पाऊच फॅक्टरीजवळ गर्दी दिसली. (Young man was beaten for Reason of finding Mobile Jalgaon Crime News)
हेही वाचा : काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली??
लताबाई त्याठिकाणी गेल्यावर त्यांना मुकेश सोनवणे आणि अजय सोनवणे जंजाळे यांचा मुलगा आनंद याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत होते.
लताबाई यांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही मारहाण करण्यात आली सोनवणे भावंडानी आनंद जंजाळे यांच्या डोक्यात काठीने मारून गंभीर दुखापत केली आहे. जखमी अवस्थेत आनंदला रुग्णालयात दाखल केले आहे.