Jalgaon Crime News : तो मित्रांच्या पार्टीला गेला अन... तरवाडे येथील घटना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

Jalgaon Crime News : तो मित्रांच्या पार्टीला गेला अन... तरवाडे येथील घटना

तरवाडे (जि. जळगाव) : तरवाडे येथील ३० वर्षीय तरुण सहा दिवसांपूर्वी हॉटेलवर मित्रांसोबत पार्टीत जेवणाला गेला असता हॉटेलजवळ भांडण सुरू झाले.

पोलिस गाडी दिसताच हा तरुण तेथून गायब (Missing) झाला, तो अद्याप घरी परतलाच नसल्याने कुटुंबीयांसह ग्रामस्थ चिंताग्रस्त झाले आहेत. (young man who went to friends party goes missing from tarawade jalgaon crime news)

याबाबत शांताराम बागूल (रा. तरवाडे) याने चाळीसगाव शहर पोलिसांना माहिती दिली, की लहान भाऊ समाधान बागूल (वय ३०) हा १५ मार्चला रात्री नऊच्या सुमारास पार्टीला जेवणाला जातो, असे सांगून घरातून गेले. पार्टीत शांताराम अर्जुन गरुड (तरवाडे) व प्रवीण लक्ष्मण देवरे (करगाव) यांच्या सोबत जेवणासाठी बाहेर जात आहे.

तुम्ही जेवण वगैरे करून घ्या, असे त्याने घरी सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळी सातच्या सुमारास समाधान कुठे आहे, असे पत्नी अरुणाबाई हिला विचारले असता पत्नीकडून समाधानबाबत काहीएक माहिती मिळाली नाही. त्यानंतर समाधानचा मित्र शांताराम गरुड याला फोन लावून विचारपूस केली असता त्याने सांगितले, की मी रात्री पार्टीला गेलो नव्हतो, समाधान कुठे आहे मला माहीत नाही, असे सांगितले.

हेही वाचा: झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच

त्यानंतर प्रवीण देवरे याला फोन लावून समाधानबाबत विचारपूस केली असता त्याने सांगितले, की आमची मित्रांची पार्टी असल्याने काल रात्री नऊच्या सुमारास आम्ही चाळीसगाव शहरातील करगाव रोडवरील गणेश मंदिराजवळ हॉटेल बंजारा येथे जेवणासाठी गेलो होतो. तेव्हा हॉटेलवर जात असताना किरकोळ कारणावरून एका अनोळखी व्यक्तीबरोबर माझे भांडण सुरू असताना पोलिस गाडी आम्हाला हॉटेलकडे येताना दिसली.

तेव्हा मित्र समाधान व शांताराम येथून काही न बोलला हॉटेलजवळून पळून गेले. त्यानंतर मी त्यांची वाट पाहिली, पण ते आले नाही म्हणून मी काही वेळानंतर घरी निघून आलो, असे प्रवीण देवरे याने सांगितले. त्यानंतर कुटुंबीयांनी समाधानचा गावात शोध घेतला, मात्र तो कुठेच आढळून आला नाही. अखेर शहर पोलिसांत हरविल्याची तक्रार दिली. त्याच्याबाबत कोणाला माहिती मिळाल्यास अगर आढळल्यास चाळीसगाव शहर पोलिसांना संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Jalgaoncrimemissing case