Doctor examining deaf and dumb students.
Doctor examining deaf and dumb students. esakal

Jalgaon News : ना धांगडधिंगा ना बडेजाव! तरुणाकडून वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रमाचा पायंडा...

Published on

Jalgaon News : एरवी वाढदिवस म्हटलं, की धांगडधिंगा आणि पार्ट्यांचे चित्र आपल्या डोळ्यांसमोर सहज उभे राहते. मात्र, तरुणांमध्ये समाजातील रंजल्या-गांजल्यांसाठी झटण्याची उमेदही काही ठिकाणी कायम आहे. (youth celebrated birthday by Health screening of deaf and dumb students jalgaon news)

वाढदिवसाला होणाऱ्या खर्चाला योग्य दिशा देत अंध-अपंग विद्यार्थ्यांची आरोग्य व डोळ्यांची तपासणीचा रतीब आज एका तरुणाने पूर्ण केला.

कुठलाही बडेजाव नाही किंवा श्रीमंतीचा ओघ नाही. इलेक्ट्रॉनिक वस्तुंची सेवा आणि विक्रीचे काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या अमित अशोक सोमाणी या तरुणाने आपल्या इतर मित्रांप्रमाणेच वाढदिवस अंध-अपंग विद्यार्थ्यांसोबत घालवला.

इतकेच नाही, त्यांची आरोग्य आणि डोळे तपासणी करवून घेत मोफत चष्म्यांची सोय देखील झाली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Doctor examining deaf and dumb students.
Jalgaon Inspirational News : ‘तो’ जिद्दीने लढला अन् जिंकाला! एका उच्चशिक्षित तरुणाचा प्रेरणादायी लढा...

अपंग सेवा मंडळ संचालित मूकबधिर विद्यालयात तापानंद बहुउद्देशीय विकास संस्थेच्या माध्यमातून अध्यक्ष ऊर्मिला सोमाणी यांचे पुत्र अमित यांचा वाढदिवसाला हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाला सुभाष माळी, उपाध्यक्षांसह कुठलेही व्हीव्हीआयपी न बोलावता सोबतचे चार मित्र आणि डोळे तपासणीसाठी डॉ. योगेश बसेर, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. राहुल महाजन, सहाय्यक राहुल पवार यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांना नंबरचे चष्मे उपलब्ध करून देण्यात आले.

सोबतच अल्पोपाहार देऊन आगामी काळातही उपक्रम घेणार असल्याची ग्वाही दिली. कार्यक्रमासाठी शिक्षक नीता तापडिया, निशांतसर, हेमंत मुंदडा आदींचे सहकार्य लाभले.

Doctor examining deaf and dumb students.
Inspirational News : देशभरात हजार गावांतील १ कोटी लोकांना धान्य; स्वातंत्र्यदिनी रॉबिनहूड आर्मीचे ‘मिशन स्वदेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com