Jalgaon ZP News : ठेकेदारांना जिल्हा परिषदेचा दणका! सीईओ अंकित यांच्या आदेशानंतर नोटीस

 Jalgaon Zilla Parishad
Jalgaon Zilla Parishad esakal

Jalgaon ZP News : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत काढण्यात आलेल्या निविदाप्रक्रियेत स्पर्धा होऊ न देता, एकाच आयपी ॲड्रेस व एकाच ई-मेल आयडीवरून निविदा भरली जात होती.

संगनमत करून निविदाप्रक्रिया पारदर्शक होऊ न देण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन ठेकेदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या आदेशानंतर नोटीस बजावत संबंधित निविदाप्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. (zp Notice to two contractors who tried not to make tender process transparent jalgaon news)

जळगाव जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत उंबरखेड (ता. चाळीसगाव) राज्य मार्ग २५ रस्ता ६६ किमी ते २.१० सुधारणा करण्याची ९९ लाख २० हजार ५६६ रुपयांच्या कामासाठी ई-निविदाप्रक्रिया राबविण्यात आली होती. या कामासाठी ठेकेदारांकडून टेंडर मागविण्यात आले होते. दरम्यान, यात तीन मक्तेदारांनी ई-निविदा भरली.

निविदा सादर करताना वेगवेगळ्या आयपी ॲड्रेस व वेगवेगळ्या ई-मेल आयडीवरून सादर करणे गरजेचे असताना त्यापैकी दोन मक्तेदारांचे एकच आयपी ॲड्रेस व एकच ई-मेल आयडी होते. जिल्हा परिषदेला या निविदाप्रक्रियेत स्पर्धात्मक दर मिळाले नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

 Jalgaon Zilla Parishad
Jalgaon News : जिल्ह्यातील निराधारांना 345 कोटी वितरण; वर्षभरातील चित्र

प्रक्रिया रद्द करून नव्याने मागविल्या निविदा

दोन्ही निविदाकारांनी संगनमत करून निविदाप्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केल्याचे सिद्ध झाले. मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या निविदा समितीच्या ही बाब लक्षात आल्यानंतर निविदाप्रक्रियेत स्पर्धेला वाव उरला नसल्याने तातडीने संबंधित कामाची ई-निविदाप्रक्रिया रद्द करण्यात आली.

एकाच आयपी ॲड्रेसवरून ई-निविदा दाखल करणाऱ्या पी. एस. कुमावत ॲन्ड कंपनी व साई भूमी कंट्रक्शन या दोघाही मक्तेदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. सदरचे निविदा रद्द करून या कामासाठी पुन्हा निविदा मागविण्यात आल्या आहेत.

 Jalgaon Zilla Parishad
Jalgaon News : ‘पाखरांबाबत’व्यापक स्वरूपात जनजागृती; वन्यजीव संरक्षण संस्थेचा ‘बिग बटरफ्लाय मंथ’मोहिमेत सहभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com