
रेल्वेमध्ये भरतीची मोठी संधी, १२वी पास करू शकतात अर्ज
Railway Recruitment 2022: रेल्वमध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्यासाठी एक चांगली संधी आहे. दक्षिण पूर्व मध्ये रेल्वे स्पोर्ट कोटयांतर्गत काही पदांची भरती करणार आहे. रिक्त पदांची संख्या २१ आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवार एसईसीआर च्या आधिकृत संकेस्थळाला भेट secr.indianrailways.gov.in देऊन अर्ज करू शकतो.
अर्ज नोंदविण्याची शेवटची तारीख ५ मार्च २०२२ आहे.
हेही वाचा: नोकरीवर घेतानाच ‘वर्क फ्रॉम होम’ची अट
जे उमेदवार लेवल २/३ पदावर अर्ज करू इच्छित आहे त्यांना मान्यता प्राप्त संस्थामध्ये १२ वी पास होणे गरजेचे आहे. याशिवाय त्यांच्याकडे खेळाशी संबंधित कामगिरी असायला हवी.
लेवल ४ आणि लेवल ५ पदांवर अर्ज करण्यासाठी मान्यता प्राप्त विश्व विद्यालायामध्ये कोणत्याही विषयामध्ये पदवीधर असला पाहिजे. त्याशिवाय उमेदवारांकडे खेळाशी संबंधित कामगिरी देखील असली पाहिजी.
हेही वाचा: All The Best! आजपासून बारावीच्या परीक्षा; कोरोनानंतर पहिल्यांदाच ऑफलाईन
अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे कमीत कमी वय १८ आणि जास्ती जास्त २५ वर्ष असले पाहिजे. वयोमर्यादामध्ये कोणत्याही उमेदवारला सुट मिळणार नाही.
अनारक्षित वर्ग उमेदवारांना अर्जासाठी ५०० रुपये शुल्क भरावे लागेल. SC/ST प्रवर्गातील इतर उमेदवारांना अर्जासाठी २५० रुपये शुल्क भरावे लागेल. उमेदवारांना एसईसीआर अधिकृत वेबसाईटला secr.indianrailways.gov.in या माध्यमातून अर्ज करू शकता
Web Title: Great Opportunity For Recruitment In Railways 12th Pass Can Apply
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..