

Indian Railways recruitment
Sakal
भारतीय रेल्वे आणि भारतीय लष्कराने संयुक्तपणे एक नवीन 'को-ऑपरेशन फ्रेमवर्क'चा उपक्रम सुरू केला आहे. रेल्वेमध्ये माजी सैनिक आणि अग्निवीरांना चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांना लष्करी सेवेतून नागरी जीवनात सहजतेने संक्रमण करणे शक्य करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. रेल्वे मंत्रालय आणि लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम सुरू करण्यात आला. देशाची सेवा केलेल्या माजी सैनिकांना सन्माननीय दुसऱ्या कारकिर्दीची संधी प्रदान करणे आणि राष्ट्र उभारणीत त्यांची भूमिका सुरू राहिल हे मुख्य उद्दिष्ट आहे.