​ISRO Recruitment 2023 : तरुणांनो मिळवा इस्रोमधे काम करण्याची संधी, Graduates साठी पद भरती...

उमेदवार isro.gov.in आणि nrsc.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या भरतीसाठी अर्ज करू शकतात
​ISRO Recruitment 2023
​ISRO Recruitment 2023esakal

ISRO Recruitment 2023 : इस्रोमध्ये सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. भारत सरकारच्या अंतराळ विभागांतर्गत भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू असून उमेदवार ७ एप्रिलपर्यंत अर्ज करू शकतात. उमेदवार isro.gov.in आणि nrsc.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

इस्रो भर्ती 2023: तुम्ही या तारखेपर्यंत अर्ज करू शकता

इंडियन स्पेस अँड रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) च्या भरती अधिसूचनेनुसार, संस्थेतील या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 एप्रिल 2023 ही निश्चित करण्यात आली आहे.

ISRO भर्ती 2023 : कोणत्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत ते जाणून घ्या

भारतीय अंतराळ आणि संशोधन संस्थेने आयोजित केलेल्या या भरती मोहिमेद्वारे एकूण 34 पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये ज्युनियर रिसर्च फेलो (JRF) ची 20 पदे, रिसर्च सायंटिस्ट (RS) ची 4 पदे, प्रोजेक्ट असोसिएट-I ची 7 पदे आणि प्रोजेक्ट सायंटिस्टची 3 पदे भरायची आहेत.

इस्रो भर्ती 2023: इलिजीबीलीटी क्रायटेरीया

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून BE/B.Tech/B.Sc/M.Sc पदवी किंवा समकक्ष पात्रता असावी.

​ISRO Recruitment 2023
Govt job : मोठी बातमी! शासनाच्या नोकरभरतीच्या वयोमर्यादेत वाढ; आता अर्जदार...

इस्रो भर्ती 2023 : निवड प्रक्रिया

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड CBT/मुलाखतीच्या आधारे केली जाईल. (ISRO)

इस्रो भर्ती 2023 : तुम्हाला किती पगार मिळेल ते जाणून घ्या

इंडियन स्पेस अँड रिसर्च ऑर्गनायझेशनच्या या भरतीअंतर्गत, विविध पदांवर निवडलेल्या उमेदवारांना 31,000 रुपये ते 56,000 रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल. (Job)

​ISRO Recruitment 2023
ISRO Free Education : विद्यार्थ्यांना आता इस्रोच्या शास्त्रज्ञांकडून घेता येणार मोफत शिक्षण

इस्रो भर्ती 2023 : याप्रमाणे अर्ज करा

  • सर्वप्रथम www.nrsc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.

  • आता होमपेजवर करिअर टॅबवर क्लिक करा

  • 'विविध तात्पुरत्या संशोधन कर्मचार्‍यांच्या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा' वर क्लिक करा.

  • तुमची क्रेडेन्शियल्स वापरून नोंदणी करा.

  • लॉगिन करा आणि अर्ज भरा.

  • सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

  • अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट वर क्लिक करा.

  • डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंटआउट घ्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com