esakal | खुशखबर! रेल्वेत 'या' पदांसाठी भरती; 92 हजारपर्यंत मिळणार पगार
sakal

बोलून बातमी शोधा

Railway Recruitment

रेल्वेत भरतीसाठी तयारी करत असलेल्या उमेदवारांकरिता ही महत्वाची बातमी!

खुशखबर! रेल्वेत 'या' पदांसाठी भरती; 92 हजारपर्यंत मिळणार पगार

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

Railway Recruitment 2021 : रेल्वेत भरतीसाठी तयारी करत असलेल्या उमेदवारांकरिता ही महत्वाची बातमी! रेल्वे भरती सेलच्या पश्चिम रेल्वेने क्रीडा कोट्याअंतर्गत गट 'सी' पदांकरिता भरतीसाठी नुकतेच अर्ज मागविले आहेत. यासाठी इच्छुक उमेदवार 4 ऑगस्ट 2021 पासून rrc-wr.com या वेबसाइटवरती ऑनलाइन अर्ज करू शकतात. दरम्यान, अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 सप्टेंबर 2021 आहे. (railway recruitment 2021 apply online for group c post at rrc wr com from 4 august)

रेल्वे भरती सेलने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, पे मॅट्रिक्स पातळी 4 वर निवड झालेल्या उमेदवारांना 25500 रुपयांपासून 81100 रुपयांपर्यंत वेतनश्रेणी दिली जाईल. तसेच पे मॅट्रिक्स 5 च्या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना 29200 रुपयांपासून 92300 रुपयांपर्यंत वेतनश्रेणी दिली जाईल, तर पे मॅट्रिक्स 2 वर निवडलेल्या उमेदवारांना 19900 ते 63200 रुपये आणि वेतन मॅट्रिक्स पातळी 3 वर निवड झालेल्या उमेदवारांना 21700 ते 69100 रुपये वेतनश्रेणी दिली जाईल, असे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा: नोकरीची संधी! ऑईल इंडिया लिमिटेडमध्ये 115 पदांसाठी भरती

मॅट्रिक्स पातळी 4 आणि 5 वर अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी ऑलिम्पिक गेम्स (ज्येष्ठ प्रवर्ग) अथवा विश्वचषक (कनिष्ठ / युवा / ज्येष्ठ वर्ग), जागतिक स्पर्धा, आशियाई खेळ यात सहभाग घेतलेला असावा. तर राष्ट्रकुल स्पर्धेत किमान तिसरा क्रमांक पटकावलेला असावा. दरम्यान, शैक्षणिक पात्रतेच्या संपूर्ण तपशीलांसाठी उमेदवारांनी रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. या पदांसाठी उमेदवारांची निवड चाचणी, क्रीडा, शैक्षणिक पात्रता आणि मूल्यांकनावर आधारित असेल. यासाठी इच्छुक उमेदवार 3 सप्टेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात.

railway recruitment 2021 apply online for group c post at rrc wr com from 4 august

loading image
go to top