esakal | NTPC मध्ये नोकरीची सुवर्ण संधी; महिन्याला मिळणार 71 हजार पगार
sakal

बोलून बातमी शोधा

NTPC

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनने (NTPC) कार्यकारी आणि वरिष्ठ कार्यकारी पदांच्या भरतीसाठी नुकतीच अधिसूचना जाहीर केली आहे.

NTPC मध्ये नोकरीची सुवर्ण संधी; महिन्याला मिळणार 71 हजार पगार

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनने (NTPC, National Thermal Power Corporation Limited) कार्यकारी आणि वरिष्ठ कार्यकारी पदांच्या भरतीसाठी नुकतीच अधिसूचना जाहीर केली आहे. याकरिता उमेदवार NTPC च्या अधिकृत वेबसाइटवर (ntpc.co.in) लॉगइन करून या पदांसाठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 ऑगस्ट 2021 आहे. दरम्यान, या भरती प्रक्रियेद्वारे कार्यकारी पदांची 19 आणि वरिष्ठ कार्यकारी पदांची 3 पदे भरली जाणार आहेत.

अशी असणार पदे

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमधील पदांसाठी कमीतकमी 60% गुणांसह कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे, तर या पदांसाठी महिन्याला 71 हजार पगार देखील मिळणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.

  • बीई/बीटेक अभियांत्रिकीसाठी कार्यकारी (सल्लागार) - मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60% गुणांसह अभियांत्रिकीमध्ये पदवीधर असणे आवश्यक.

  • प्रोजेक्ट मॉनिटरिंगसाठी एक्झिक्युटिव्ह (कन्सल्टन्सी) - मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60% गुणांसह कोणत्याही विषयांत BE / B.Tech व डिप्लोमा इन प्रोजेक्ट मॅनेजमेंट व एमबीए असणे आवश्यक.

  • कार्यकारी (व्यवसाय विश्लेषक)- किमान 60% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून व्यवसाय विश्लेषणमध्ये मास्टर्स असणे आवश्यक.

  • वरिष्ठ कार्यकारी (सोलर) - मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60% गुणांसह कोणत्याही विषयातील अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक.

  • वरिष्ठ कार्यकारी (कंपनी सचिव) - ICSI चे सदस्य असणे आवश्यक आहे.

  • वरिष्ठ कार्यकारी (कॉर्पोरेट कम्युनिकेशन) - पोस्ट ग्रॅज्युएट पदवी किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन कम्युनिकेशन अॅडव्हर्टायझिंग अॅण्ड कम्युनिकेशन मॅनेजमेंट/ पब्लिक रिलेशन्स/ मास कम्युनिकेशन/ जर्नालिझम मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे.

  • कार्यकारी (क्लीन टेक्नोलॉजी) - कोणत्याही विषयातील अभियांत्रिकी/टेक्नोलॉजी पदवी व किमान 60% गुणांसह M.Tech/Ph.D लाही प्राधान्य दिले जाणार आहे.

loading image
go to top