esakal | संरक्षण मंत्रालयात 400 पदांसाठी बंपर भरती; 10 वी विद्यार्थ्यांनाही संधी
sakal

बोलून बातमी शोधा

Defense Ministry

संरक्षण मंत्रालयाने 10 वी पास विद्यार्थ्यांसाठी विविध पदांची भरती काढली आहे.

संरक्षण मंत्रालयात 400 पदांसाठी बंपर भरती

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

Defense Ministry Recruitment 2021 : संरक्षण मंत्रालयाने (Defense Ministry) 10 वी पास विद्यार्थ्यांसाठी विविध पदांची भरती काढली आहे. भारतीय लष्कराच्या सर्व्हिस कॉर्प्स (ASC) या भरतीअंतर्गत सिव्हिल मोटर ड्रायव्हर, क्लीनर, कुक, सिव्हिलियन केटरिंग इन्स्ट्रक्टरची पदे भरली जाणार आहेत. ही भरती एएससी सेंटर उत्तरसाठी आहे, तर MTS आणि कामगार पदांसाठी भरती (ASC) दक्षिण केंद्रासाठी असेल. भरतीची ही जाहिरात 28 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर रोजी रोजगार वर्तमानपत्रात प्रकाशित झालीय. अधिसूचनेनुसार, भरती जाहिरात जारी केल्यापासून 21 दिवसांपर्यंत अर्ज केले जाऊ शकतात.

संरक्षण मंत्रालय ASC केंद्र भरती 2021 : रिक्त पदांचा तपशील

एकूण पदे - 400

 • एएससी केंद्र (उत्तर)

 • सिव्हिल मोटर ड्रायव्हर (पुरुष उमेदवारांसाठी) - 115 पदे

 • क्लिनर- 67 पदे

 • कुक - 15 पदे

 • सिव्हिलियन केटरिंग इंस्ट्रक्टर- 3 पदे

 • एएससी सेंटर (दक्षिण)

 • कामगार (पुरुष उमेदवारांसाठी) - 194 पदे

 • एमटीएस (सफाईवाला) - 7 पदे

 • एएससी सेंटर ग्रुप (C) वेतन

 • सिव्हिल मोटर ड्रायव्हर - 19000 दरमहा + महागाई व इतर भत्ता

 • क्लीनर - 18000 दरमहा महागाई भत्त्यासह

 • कुक - 19000 दरमहा + महागाई व इतर भत्ता

 • सिव्हिलियन केटरिंग इन्स्ट्रक्टर - 19000 दरमहा + महागाई व इतर भत्ता

 • एमटीएस - 18000 दरमहा महागाई भत्त्यासह

 • लेबर - 18000 प्रति महिना महागाई भत्त्यासह

हेही वाचा: अभियांत्रिकी पदविका प्रवेशांना मुदतवाढ

शैक्षणिक पात्रता

 • सिव्हिल मोटर ड्रायव्हर - एलएमव्ही, एचएमव्ही परवान्यासह 10 वी पास आणि दोन वर्षांचा अनुभव

 • क्लीनर - 10 वी उत्तीर्ण आणि क्लीनरच्या कामात पारंगत

 • स्वयंपाक - स्वयंपाकात प्राविण्यासह 10 वी उत्तीर्ण

 • सिव्हिलियन केटरिंग इन्स्ट्रक्टर - डिप्लोमा किंवा केटरिंगमध्ये प्रमाणपत्रासह 10 वी उत्तीर्ण

 • कामगार - 10 वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

 • एमटीएस - 10 वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

हेही वाचा: ‘सीईटी’च्या तारखा लवकरच जाहीर होणार

वयोमर्यादा

सिव्हिल मोटर ड्रायव्हरसाठी 18 ते 27 वर्षे आणि इतर सर्वांसाठी 18 ते 25 वर्षे वयोमर्यादा असणार आहे.

निवड प्रक्रिया - उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणीच्या आधारे केली जाईल.

loading image
go to top