esakal | नोकरीची संधी! 'इंडियन ऑईल'मध्ये 480 पदांसाठी भरती; सप्टेंबरमध्ये होणार परीक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

IOCL

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडने (IOCL) अप्रेंटिस पदांकरिता भरतीसाठी अधिसूचना जाहीर केलीय.

नोकरीची संधी! 'इंडियन ऑईल'मध्ये 480 पदांसाठी भरती

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

IOCL Recruitment 2021 : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडने (IOCL) अप्रेंटिस पदांकरिता भरतीसाठी अधिसूचना जाहीर केलीय. या अंतर्गत एकूण 480 पदांची भरती केली जाणार असून इच्छुक उमेदवार iocl.com वर अथवा IOCL च्या अधिकृत वेबसाइटवर देखील अर्ज करू शकतात. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 13 ऑगस्टपासून सुरू झाली असून 28 ऑगस्ट 2021 पर्यंत चालणार आहे. IOCL ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, तांत्रिक आणि नॉन टेक्निकल प्रशिक्षणार्थींची भरती दक्षिण भारतातील राज्यांमध्ये (तामिळनाडू, पाँडेचरी, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा) केली जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केलेय.

महत्वाचे : तांत्रिक आणि नॉन टेक्निकल प्रशिक्षणार्थी पदांसाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी 'या' तारखा लक्षात ठेवाव्यात..

  • अर्ज भरण्यास प्रारंभ : 13 ऑगस्ट 2021

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 ऑगस्ट 2021

  • लेखी परीक्षा : 19 सप्टेंबर 2021

  • कागदपत्र पडताळणी : 27 सप्टेंबर 2021

अशी होईल निवड

उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षेत मिळालेले गुण आणि त्यांच्या कामगिरीच्या आधारे केली जाईल. तसेच, लेखी परीक्षा मल्टीपल चॉईस प्रश्नांसह (MCQ) घेतली जाईल. ज्यात एक योग्य पर्याय असलेले चार प्रश्न असतील, तर उमेदवार परीक्षेशी संबंधित तपशीलांसाठी IOCL च्या अधिकृत साइटला भेट देऊ शकतात. या पदांकरिता ऑनलाइन अर्ज करणाऱ्या उमेदवारांना किमान 18 ते 24 वर्षांचा अनुभव असावा. याशिवाय आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार शिथिलता दिली जाईल, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

loading image
go to top