esakal | WHOचा निष्कर्ष : ओव्हर टाईम करून पैसे कमवाल पण जीव गमवाल
sakal

बोलून बातमी शोधा

कंपनीतील कामाचा ताण

जागतिक आरोग्य संघटनेने कर्मचाऱ्यांच्या कामाविषयी सर्व्हे केला होता. त्यांनी संपूर्ण जगातील वर्किंग कल्चरचा अभ्यास केला.

WHOचा निष्कर्ष : ओव्हर टाइम करून पैसे कमवाल पण जीव गमवाल!

sakal_logo
By
टीम ई सकाळ

अहमदनगर ः जगात प्रत्येक देशातील वर्किंग कल्चर वेगळे आहे. कार्पोरेट कंपन्यांमध्ये कामाचे तास ठरलेले आहेत. काही आस्थापनांमध्ये पाचच दिवसांचा आठवडा असतो. शनिवार व रविवारी सुट्टी दिली जाते. प्रत्येकच कंपनीत कर्मचाऱ्यांना पोषक वातावरण मिळेल असे नाही. मोजक्या कंपन्या सोडल्या तर कर्मचाऱ्यांना दहा ते बारा तास काम करावे लागते.

कामातील ताणतणावामुळे अत्यंत जीवघेणे परिणाम होतात. भारतात हे प्रमाण जरा जास्त आहे. दुसरं तिसरं कुणी नाही तर जागतिक आरोग्य संघटनेने तसा इशारा दिलाय.(Risk of heart attack to employees due to overtime)

जागतिक आरोग्य संघटनेने कर्मचाऱ्यांच्या कामाविषयी सर्व्हे केला होता. त्यांनी संपूर्ण जगातील वर्किंग कल्चरचा अभ्यास केला. रात्री उशिरा अॉफिसमध्ये थांबवून काम केल्याने कर्मचाऱ्याच्या आरोग्यावर दुष्परिणाम झाल्याचे दिसते. त्या कर्मचाऱ्याला हृदयासंबंधी आजार होतात. सन २०१६ची आकडेवारी भयंकर आहे. त्या वर्षात 7 लाख 45 हजार जणांचा मृत्यू झाला. दक्षिण-पूर्व आशिया आणि पश्चिम पॅसिफिक क्षेत्रातील हे आकडे आहेत.

हेही वाचा: वाडीतली पोरं सगळ्यात म्होरं ः १६ फौजदार, १४ क्लासवन अधिकारी

काही कंपन्या ओव्हर टाइम केल्यानंतर पैसे देतात. परंतु हेच पैसे जीव घेऊ शकतात. दर आठवड्याला 35 ते 40 तास काम गृहित धरले जातात. काहीजण ओव्हर टाइम करतात. त्यामुळे कामाचे तास साधारण ५५ तास होतात. हे जास्तीचे काम करणाऱ्यांमध्ये 35 टक्के ह्रदयविकार आढळून आला. हा धोका15 टक्क्यांनी वाढलेला दिसून आले.

वर्क फ्रॉम होममुळे पडते जास्तीचे काम

जागतिक कामगार संस्थेच्या (ILO) सहकार्याने हे संशोधन केलं गेलं. मृत्यूमुखी पडणाऱ्यांमध्ये तरूणांचे प्रमाण कमी आहे. मध्यम वयाचे किंव वृद्ध कर्मचाऱ्यांना ओव्हर टाईमचा ताण सहन होत नाही. सध्या कोरोनाचा काळ सुरू आहे. त्यामुळे या संशोधनात ती आकडेवारी गोळा करता आली नाही. सध्या अनेक कंपन्या वर्क फ्रॉम देतात. घरून काम असले कर्मचाऱ्यांवर ताणाचा ताण वाढला आहे. नोकरी जाण्याच्या भीतीने कर्मचारी जास्तीचे काम करतात. या कामाचा त्यांना मोबदलाही मिळत नाही.

जागतिक आरोग्य संघटनेचे टेक्निकल ऑफिसर फ्रँक पेगा सांगतात, "लॉकडाऊन लागल्यास त्याठिकाणी कामाच्या तासात 10 टक्क्यांची वाढ होते." जास्तीचा कामाचा ताण येतो. या ताणामुळे एक तृतीयांश प्रमाण वाढते. म्हणूनच जास्तीचे काम करणं, हे कामामुळे येणाऱ्या ताणाचं सर्वात मोठं कारण असल्याचं स्पष्ट होतं.

जास्तीच्या कामाचा असा होतो परिणाम

जास्तीच्या कामामुळे मेंदूवर परिणाम होतो. एकाच जागेवर काम केल्याने तंबाखू खाणे, धूम्रपान, मद्यपानासारखी व्यसन जडतात. पुरेशी झोप होत नाही, व्यायामाचा कंटाळा केला जातो. पौष्टीक आहारही घेतला जात नाही. त्याचा सर्वांगीण परिणाम आरोग्यावर होतो.

जोनाथन फ्रॉस्टिक यांनी लिंकडेनवर एक पोस्ट शेअर केली होती. ही बरीच शेअर झाली होती. उशिरापर्यंत काम केल्याने होणाऱ्या दुष्परिणामांविषयीची ती पोस्ट होती.

HSBC मध्ये रेग्युलेटरी प्रोग्राम मॅनेजर असणारे जोनाथन एका रविवारी पुढील आठवड्याच्या कामाचं नियोजन करण्यासाठी बसले. अचानक त्यांच्या हृदयाची धडधड वाढली, घसा, जबडा आणि हातात वेदना जाणवू लागल्या. श्वास घ्यायलाही त्रास होता. बायकोने पाहिल्याने तिने डॉक्टरांना कॉल केला. मला अॅटॅक आला होता. आता मी जास्तीचे काम करीत नाही.

HSBC ने जोनाथन यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली. कर्मचाऱ्यांचे आरोग्य जपण्यासाठी आम्ही बांधिल असल्याची प्रतिक्रिया दिली. कोरोनामुळे वर्क फ्रॉम होम करणाऱे आठवड्याला सरासरी 6 तास ओव्हरटाईम करतात. ऑफिसमधून काम करणारे सरासरी जवळपास साडेतीन तास ओव्हरटाईम करत आहेत.

कर्मचाऱ्यांचे आरोग्य जपा

कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचं आरोग्य आणि कामामुळे त्यांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांविषयी विचार करायला हवा, असं जागतिक आरोग्य संघटनेचं सूचवलं आहे. कामाची वेळ ठरवून द्यायला हवी. यामुळे कामाचा दर्जाही सुधारतो, असंही संघटनेचं म्हणणं आहे.