आकाशकंदील विक्रीतून तोंडवळीत शाळेसाठी निधी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

आचरा - तोंडवळी वरची प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक २५० आकाशकंदील तयार करून तोंडवळी गावात त्याची विक्री करून शाळेसाठी निधी निर्माण केला आहे. या स्तुत्य उपक्रमात ग्रामस्थांनी सहभाग घेत तोंडवळी वरची प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. 

आचरा - तोंडवळी वरची प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक २५० आकाशकंदील तयार करून तोंडवळी गावात त्याची विक्री करून शाळेसाठी निधी निर्माण केला आहे. या स्तुत्य उपक्रमास पाठबळ देणारे शिक्षक राजेश भिरंवडेकर, परशुराम गुरव व शीतल माडये यांच्यासह विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. या स्तुत्य उपक्रमात ग्रामस्थांनी सहभाग घेत तोंडवळी वरची प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. 

कंदिलाची जागा चायनीज कंदिलांनी घेतली होती. अशातच तोंडवळी वरची येथील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी तब्बल २५० पर्यावरणपूरक कंदील बनवत त्याची तोंडवळी गावात अल्प किमतीला विक्री करत शाळेसाठी निधी जमविला. यातून त्यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्याचाही संदेश दिला आहे. असे पर्यावरणपूरक कंदील बनवण्यासाठी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची एक कार्यशाळा घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

यासाठी शाळेचे शिक्षक राजेश भिरवंडेकर, परशुराम गुरव, शीतल माडये, रूपेश दुधे, अशोक डोंगळे यांनीही मेहनत घेतली. तोंडवळी ग्रामस्थांना विद्यार्थी आकाश कंदील बनवत असल्याची माहिती मिळताच शाळेला भेट देत शाळेतूनच त्यांनी आकाशकंदील खरेदी केले. या कंदिलाची मागणी वाढल्याने कमी पडत असलेले काही कंदील ग्रामस्थांनी बनवत शाळेच्या विद्यार्थ्यांना विक्रीसाठी उपलब्ध करून देत मोलाचे सहकार्य केले. आपण तयार केलेला कंदील तोंडवळी गावात प्रत्येक घरात लागला जातोय याचे समाधान तोंडवळी वरची प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sindhudurg news students collect Fund for the school by selling lantern