पारंपरिक व्‍यवसाय टिकविण्‍यासाठी युवती बनली नावाडी...

राजेंद्र कोळी
मंगळवार, 5 डिसेंबर 2017

चिक्कोडी - अलीकडच्या काळात महिलादेखील सर्वच क्षेत्रांत पुढे आहेत. सैन्यदलासह वैमानिक म्हणूनही त्या कार्यरत झाल्या आहेत; मात्र मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना पाहून हादरून गेलेले पालक त्यांना घराबाहेर पाठविण्याबाबत काळजीतही आहेत; पण ‘मुलींवरील विश्‍वास दृढ असावा’, असा संदेश त्या पालकांना देत मोळवाड (ता. अथणी) येथील १७ वर्षीय रेखा आंबी पुरुषांप्रमाणे कृष्णा नदीत होडी चालवून लोकसेवा करीत आहेl.

रेखा यांच्या कुटुंबीयांचा होडी हाकण्याचा पारंपरिक व्यवसाय आहे. तिची आजी कृष्णाबाई आंबी एका कामगाराकडून हा व्यवसाय करीत. कृष्णा नदीचे पात्र विस्तीर्ण असल्याने ते पाहताच कोणालाही धडकी भरल्याशिवाय राहत नाही, पण होडी हाकण्यास मजूर मिळत नसल्याने हा व्यवसाय बंद पडण्याच्या स्थितीत असताना रेखाने मोठे धाडस केले. त्यामुळे हा व्यवसाय पुन्हा जिवंत ठेवला आहे.

होडी चालविण्यासाठी भूगर्भ खात्याला वर्षाकाठी ठराविक रक्कम भरून टेंडर घ्यावे लागते. कृष्णाबाई आंबी गेल्या अनेक वर्षापासून घरात कोणीही पुरुष या कामात नसतानाही हे टेंडर धरतात. होडी चालविण्यासाठी एका मजुराला कामावर घेतात.

मोळवाड (ता.अथणी) ते मायाक्का चिंचली (ता. रायबाग) येथे दोन तालुक्‍यांना ये-जा करणाऱ्यांची सेवा होडीच्या माध्यमातून आंबी आजी करीत आहेत. केवळ पैसा मिळविणे हा यामागील उद्देश नसून पारंपरिक व्यवसाय चालवावा व नागरिकांची सेवा करावी, या भावनेतून उतार वयातही त्या कार्यरत आहेत. मजूर मिळण्याची समस्या निर्माण झाल्याने कृष्णाबाई चिंतेत होत्या. पण १७ वर्षीय रेखाने स्वतः होडी हाकण्याची जबाबदारी स्वीकारल्याने त्यांना आधार मिळाला आहे. रोज दिवसभार आजी व नात ही लोकसेवा करीत आहेत. 

कृष्णा नदीचे पात्र विशाल असून व आपण मुलगी असतानाही निर्भयपणे व आनंदाने होडी हाकण्याचे काम करीत आहोत. प्रवाशाकडून प्रत्येकी केवळ १० रुपये घेऊन त्यांना पैलतीरी सोडत आहोत.
- रेखा आंबी, मोळवाड

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Belgaum News young woman became a boatman