महिला, ज्येष्ठांसाठी घरपोच पुस्तक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 सप्टेंबर 2018

कोल्हापूर - ज्येष्ठ नागरिक, महिलांना वाचनासाठी घरपोच पुस्तक देण्याचा विधायक उपक्रम लक्षतीर्थ येथे सुरू होत आहे. लक्षतीर्थ विकास फाऊंडेशनने यासाठी पुढाकार घेतला आहे. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना घरपोच पुस्तक देण्याचा उपक्रम राबविला जात आहे. ‘पुस्तक आपल्या दारी’ असे या विधायक उपक्रमाचे नाव आहे. 

लक्षतीर्थ वसाहतीमध्ये मुलांवर संस्कार व्हावे, या उद्देशाने रोहन रेडेकर यांनी बालमित्र ग्रंथालय सुरू केले. गल्लीतील लहान मुलांना एकत्रित बोलवायचे आणि त्यांनी गोष्टी सांगायच्या, असा उपक्रम सुरू केला. बघताबघता त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. स्वखर्चातून काही पुस्तके आणली आणि मुलांना वाचनाची सवय लागली. आता येथे नारायणी अभ्यासिका, ग्रंथालय सुरू झाले. या ग्रंथालयात आज तब्बल तीन हजारांहून अधिक पुस्तके आहेत. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत वाचता येतील, अशा पुस्तकांचा यात समावेश आहे. या पुस्तकांचा ज्येष्ठांना आणि महिलांनाही उपयोग व्हावा, या संकल्पनेतून ‘पुस्तक आपल्या दारी’ ही संकल्पना पुढे आली.

२ ऑक्‍टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त ‘पुस्तक आपल्या दारी’ या उपक्रमाचे उद्‌घाटन होणार आहे. ग्रंथालय आणि अभ्यासिकेतील काही मुले ज्येष्ठांच्या घरी जातील. प्रत्येक आठवड्यातील शनिवार-रविवारी ही सेवा दिली जाईल. यासाठी आजपर्यंत ६५ हून अधिक नोंदणी झाली आहे. ज्येष्ठ नागरिक, महिलांना घरातून ग्रंथालयापर्यंत जाणे शक्‍य होईलच, असे नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी हा उपक्रम राबविला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Book delivery to home for women and senior citizens