गवंडी काम करत तेजसची अभियंतापदापर्यंत मजल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जुलै 2019

दुधेबावी ः वडिलांसह गवंडी काम करत करत नागेश्वरनगर-चौधरवाडी (ता. फलटण) येथील तरुण तेजस शिवाजीराव आढाव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंतापदापर्यंत मजल मारून इतरांपुढे आदर्श ठेवला आहे.

दुधेबावी ः वडिलांसह गवंडी काम करत करत नागेश्वरनगर-चौधरवाडी (ता. फलटण) येथील तरुण तेजस शिवाजीराव आढाव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंतापदापर्यंत मजल मारून इतरांपुढे आदर्श ठेवला आहे.
तेजसचे जीवन अत्यंत कष्टमय आणि हलाखीच्या परिस्थितीमध्ये गेले आहे. वडील गवंडीकाम करत असल्याने प्रत्येक सुटीत त्यांच्याबरोबर काबाडकष्ट करून शिक्षणाचा खर्च भागवत असत. गवंडीकाम ही कला त्यांच्या अंगवळणी पडली असल्यामुळे बांधकाम क्षेत्राकडे त्यांचा कल वाढला. मिरज येथील शासकीय तंत्रनिकेतनमधून सिव्हिल इंजिनियरिंगचा डिप्लोमा करून केआयटी कॉलेज, कोल्हापूर येथून बॅचलर ऑफ इंजिनियरिंग पदवी मिळवली. त्यानंतर लगेचच त्यांची शासकीय तंत्रनिकेतन रत्नागिरी येथे अभ्यागत अधिव्याख्यातापदी नियुक्ती झाली. विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगचे धडे देत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू ठेवला होता. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे फेब्रुवारी 2019 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेतून तेजस आढाव यांची कनिष्ठ अभियंतापदी (स्थापत्य) गट ब (आराजपत्रित) निवड झाली आहे. या परीक्षेत तेजस यांनी 59 हजार परीक्षार्थींमधून 200 पैकी 146 गुणांसह गुणवत्ता यादीत स्थान मिळवून यश संपादन करत शासनाच्या सेवेत रुजू होण्याचे स्वप्ने पूर्ण केले. 
तेजस यांच्या यशामध्ये आई रेखा आढाव, वडील शिवाजीराव आढाव मिस्त्री यांच्यासह प्राचार्य जाधव, प्रा. साळुंखे, प्रा. हैनाळकर, सचिन गायकवाड, मंगल खरात, प्रा. रमेश आढाव, अजित आढाव, रमेश आढाव मिस्त्री, आकाश आढाव, रोहित गायकवाड, गणेश काळे, सुशांत पाटील, समाधान हिप्परकर, रोहन डोने यांचा मोलाचा वाटा आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: From masonry to the Engineer