कष्टकरी महिलेने स्मशानाला दिल्या अडीच हजार शेणी दान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 मार्च 2017

श्रमगंगेला प्रसन्न करीत संसाराचा गाडा हाकणाऱ्या येथील श्रीमती मंदा ऊर्फ बनाक्का बाबूराव पागर यांनी पंचगंगा स्मशानभूमीकडे अडीच हजार शेणी सुपूर्द केल्या.

कोल्हापूर - श्रमगंगेला प्रसन्न करीत संसाराचा गाडा हाकणाऱ्या येथील श्रीमती मंदा ऊर्फ बनाक्का बाबूराव पागर यांनी पंचगंगा स्मशानभूमीकडे अडीच हजार शेणी सुपूर्द केल्या.

स्वतःची जनावरे नसतानाही दुसऱ्याकडे जाऊन त्या शेणी लावण्याचे काम करतात. त्या पोटी मिळणाऱ्या शेणींपैकी स्वतःच्या गरजेपुरत्या शेणी शिल्लक ठेवून उर्वरित शेणी त्यांनी स्मशानभूमीकडे दिल्या. होळीच्या पूर्वसंध्येला वयाच्या साठीत मंदा पागर यांनी हा अनोखा आदर्श घालून दिला. कोल्हापूर महापालिकेने अभिनंदनाचे पत्र देऊन त्यांचा सन्मान केला. श्रीमती पागर मूळच्या भोसलेवाडी येथील असून सध्या दुधाळी येथे राहतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Positive story of Kolhapur's Manda Pagar

टॅग्स