७० ज्येष्ठ नागरिकांच्या नजरेत भरला प्रकाश

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

नागपूर - दृष्टिहीन नागरिकांच्या अंधकारमय जीवनात प्रकाशाची जीवनछटा फुलविण्यासाठी डोळस व्यक्तींचे मरणोत्तर नेत्रदान पुण्यकर्म ठरते. परंतु, नजरेत मोतीबिंदू वाढल्याने अंधत्व येऊ नये यासाठी शासनाने मोतीबिंदू मुक्तीचा उपक्रम हाती घेतला. मध्य प्रदेशातील ज्येष्ठ नागरिकांच्या नेत्रतपासणीसाठी मेडिकलच्या डॉक्‍टरांचे पथक नुकतेच गेले होते. यातील ७० ज्येष्ठ नागरिकांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून त्यांच्या नजरेत प्रकाश पेरण्याचे  पुण्यकर्म या पथकाने केले.   

मोतीबिंदू वाढला की, नजर धूसर होते. मोतीबिंदू फुटला तर डोळे जाण्याची वेळ येते.  मेडिकलच्या नेत्ररोग विभागाच्या चमूने मध्य प्रदेशच्या छिंदवाडा येथील पंधराखेडी खेड्यातील नागरिकांचे नेत्र तपासण्याचे काम केले. गणपतराव पाठे स्मृतिप्रीत्यर्थ व ललिता पाठे यांच्या दीर्घायुष्यासाठी ‘नाती नतरा’ स्वयंसेवी संघटनेतर्फे ज्येष्ठांची नजर तीक्ष्ण करण्यासाठी मेडिकलतर्फे विशेष जनजागरण मोहीम राबविण्यात आली. मेडिकलच्या नेत्ररोग विभागाचे पथक या गावात पोहोचले. चारशेवर घर असलेल्या प्रत्येक घरातील नागरिकांची नेत्रतपासणी करण्यात आली. नेत्ररोग विभागप्रमुख डॉ. अशोक मदान यांच्या मार्गदर्शनात पाच डॉक्‍टरांच्या पथकाने नेत्रतपासणी केली. यावेळी निवृत्त मुख्याध्यापक भाऊराव पराडकर, सरपंच पंचफुला सरेयाम, रामलाल रबडे, प्रादेशिक न्याय सहायक प्रयोगशाळेतील सेवानिवृत्त रासायनिक विश्‍लेषक सुभाष पाठे उपस्थित होते.

रक्तदाबाच्या रुग्णांचे प्रमाण अधिक   
महात्मा गांधी म्हणायचे खेड्याकडे चला. परंतु, डॉक्‍टरांना ग्रामीण भागात, तालुका स्तरावर सेवा देण्यात रस नाही. यामुळे ग्रामीण जनतेसाठी आरोग्य शिबिर हा एक पर्याय आहे. मेडिकलच्या डॉक्‍टरांकडून नेत्ररोग तपासणी केल्यानंतर गावखेड्यातील नागरिकांचा रक्तदाब, मधुमेह  तपासणीचे काम डॉ. अनिल खंडेलवाल आणि त्यांच्या पथकाकडून करण्यात आले. सर्व सेवा मोफत होत्या. संचालन प्रियांका पाठे यांनी केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 70 old people eye Cataract operation success light