वाया जाणाऱ्या अन्नातून  भागविली गरजूंची भूक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

औरंगाबाद - देशभरात भूकबळींची गंभीर समस्या आहे. त्यामुळे जागतिक क्रमवारीत भारत शंभराव्या स्थानी आहे. यात कुपोषणाच्या बळींची संख्या मोठी असल्याचे इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्युटच्या संशोधनात म्हटले आहे. त्यामुळे वाया जाणाऱ्या अन्नाचे संकलन करून ते गरजू लोकांपर्यंत पोचविण्याचे काम ‘आधार ग्रुप’ने हाती घेतले असून, अडीच महिन्यांत त्यांनी ५००हून अधिक गरजूंपर्यंत अन्न पोचविले आहे.

शहरातील हॉटेल्स, मंगल कार्यालये, मेस, लग्न समारंभ येथे उरलेले अन्न फेकण्यात येते. त्यामुळे या अन्नाचा सदुपयोग व्हावा यासाठी आधार ग्रुपची काही युवकांनी स्थापना केली. त्यात मुकेश कान्हेरे, डॉ. रिंकू पळसकर, सत्यजित पळसकर, संजय खंडागळे, मंगेश तोडकर, नंदकिशोर वाढेकर या युवकांचा समावेश आहे. अडीच महिन्यांपासून सुरू असलेल्या उपक्रमात नागरिकही त्यांना चांगल्या भावनेने सहकार्य करीत असल्याने गरजूंपर्यत अन्न पोचविण्याचे काम दिवसेंदिवस वाढत असल्याचे मुकेश कान्हेरे यांनी सांगितले. अद्याप आमची ओळख मर्यादित आहे. मात्र, नागरिकांनी संपर्क साधल्यास आम्ही त्यांचे वाया जाणारे अन्न गरजूंपर्यंत पोचवू शकतो. त्यासाठी ९०७५०६६६५८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन कान्हेरे यांनी केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aadhar group has provided food to needy people