टवाळकी करणारी मुले शैक्षणिक प्रवाहात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 एप्रिल 2017

पुणे - शाळेत शिकताना अक्षरे आणि आकड्यांच्या विश्‍वात फारशी न रमणारी, त्यामुळे अभ्यासात मागे पडणारी आणि घरात कोणी लक्ष द्यायला नसल्याने टवाळक्‍या करणाऱ्या मुलांवर आता संस्कार होऊ लागले आहेत. त्यामुळे त्यांचे आयुष्य एका वेगळ्या वळणावर येत आहे. ते विविध कलाकृतींच्या माध्यमातून कौशल्य आणि मूल्यशिक्षणाचे धडे गिरवित आहेत. त्यामुळे वस्तीमधील मुले आता शिस्तीत अ, आ, ई शिकू लागले आहेत. त्यामुळे त्यांची शैक्षणिक वाटचाल प्रगतीच्या दिशेने सुरू आहे. 

कोथरूडमधील केळेवाडी येथील वस्तीतील मुलांसाठी अभिनव विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांपासून हे काम केले जात आहे. वस्तीमधील बहुतांश विद्यार्थी हे महापालिकेच्या शाळेमध्ये शिक्षण घेतात. मात्र, या शाळांमधील शिक्षणाची अवस्था अतिशय बिकट आहे. आठवीतील मुलांनादेखील साधी गणिते, एबीसीडी येत नाही. या विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळत नसल्यामुळे अर्थातच भविष्यात त्यांच्यासाठी रोजगाराच्या फारशा संधी उपलब्ध होत नाहीत. 

याबाबत प्रतिष्ठानच्या संस्थापिका गौरी सोनावणे म्हणाल्या,‘‘ संस्कार वर्गात मुलांना चित्रकलेतून पर्यावरण, सूर्यमाला अशा विविध गोष्टींची माहिती दिली जाते; तर विविध कलाकुसरींच्या माध्यमातून त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळतो. विविध शैक्षणिक खेळही खेळले जातात. मुलांच्या आवडीनिवडींचा विचार करून त्यानुसार त्यांना काम दिल्यामुळे मुलेदेखील अतिशय उत्साहाने या वर्गांमध्ये सहभागी होतात.’’

संस्कार वर्गात आल्यानंतर वेगवेगळे खेळ, चित्रकला अशा उपक्रमामधून दररोज नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यातून अभ्यासाविषयी जास्त गोडी निर्माण झाली असून, मजाही येते. आता मी इंग्रजी मुळाक्षरे लिहू शकतो. मराठीही चांगल्याप्रकारे वाचू शकतो. 
- विनायक कांबळे, विद्यार्थी  
 
वस्तीतील इतर टवाळ मुले, त्यांची भांडणे यामुळे वस्तीतील वातावरण काहीसे असुरक्षित होते. गौरी मॅडममुळे वस्तीतील बहुतांश मुले चांगल्या उपक्रमांत सहभाग घेऊ लागली. त्यामुळे गेली काही महिने इथले वातावरण सुधारले आहे. 
- प्रीती चव्हाण, विद्यार्थिनी

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Abninav vikas Foundation