कोरोनावर मात केलेल्या रसिका यांचा सल्ला; घाबरू नका; मानसिकदृष्ट्या खंबीर रहा

अक्षता पवार - सकाळ वृत्तसेवा
Monday, 13 July 2020

मनातील भीती हेच त्यामागचे कारण होते. मात्र, समुपदेशनामुळे भीती दूर करणे शक्‍य झाले... कोरोना झाल्यास घाबरू नका. मानसिकदृष्ट्या खंबीर रहा, असा सल्ला कोरोनामुक्त झालेल्या रसिका चन्नशेट्टी यांनी दिला.

पुणे - कोरोनाच्या संसर्गानंतर उपचारामुळे आठ दिवसांत ताप उतरला. मात्र, थरकाप काही संपत नव्हता. मनातील भीती हेच त्यामागचे कारण होते. मात्र, समुपदेशनामुळे भीती दूर करणे शक्‍य झाले... कोरोना झाल्यास घाबरू नका. मानसिकदृष्ट्या खंबीर रहा, असा सल्ला कोरोनामुक्त झालेल्या रसिका चन्नशेट्टी यांनी दिला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

रसिका (वय ४०) या पोस्ट कार्यालयात एजंट म्हणून काम करतात. त्या कामानिमित्त पोस्टात गेल्या होत्या. मात्र एकाएकी त्यांना ताप आला. त्यामुळे दवाखान्यात तपासणी केली असता त्यांना सामान्य फ्लू झाल्याचे समजले. पाच दिवसांच्या उपचारानंतर त्या ठीक झाल्या. मात्र, कुटुंबीयांनी त्यांना कोरोनाची चाचणी करण्यासाठी आग्रह केला. त्यामुळे लगेचच त्यांनी चाचणी केली. २८ तासांनंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचा ई-मेल आला व अन त्या खचून गेल्या. आपल्यामुळे कुटुंबातील इतरांना संसर्ग झाला की काय?, अशी भीती त्यांच्या मनात होती. त्यामुळे त्या रुग्णालयात दाखल झाल्या. त्यावेळी त्यांना शारीरिक व मानसिक थकवाही जाणवू लागला. दरम्यान, कुटुंबीयांतील सर्वांचेच अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना धीर आला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनामुळे सोसायटीची प्रतिक्रिया काय असेल?, मित्रपरिवार कसा वागेल? तसेच, सामाजिक बहिष्कारापर्यंत मनात भीती दाटली. यासाठी समुपदेशक स्मिता कुलकर्णी यांनी मदत केली. कुटुंबीयांसाठी चहा-नाष्टा घेऊन मित्र परिवार जात व सोसायटीतून अनेकांचे धीर देणारे फोन येत असल्याने माझी चिंता दूर झाली. तसेच, या आजारावर मात करून पुन्हा परिवाराबरोबर असल्याचा आनंद रसिका यांनी व्यक्त केला. 

पुण्यात चहा पेक्षा किटली गरम; पोलिसांकडून रस्ते अडविण्यास सुरवात, पाहा व्हिडिओ

कोरोनाबाधित रुग्णांसह कुटुंबीय तसेच सोसायटीमधील रहिवाशांना शास्त्रशुद्ध माहिती देणे व मार्गदर्शनाचे कार्य ‘कुटुंब प्रबोधन मंडळ’ संस्थेतर्फे करण्यात येते. त्यामुळे रुग्णांची मानसिकस्थिती सकारात्मक राहते व कुटुंबीयांबाबत असलेली चिंता दूर होते. तसेच, रुग्णाला कोरोनाशी लढायला धीर मिळतो. 
- स्मिता कुलकर्णी, समुपदेशक, कुटुंब प्रबोधन मंडळ

रुग्णालयात वेळोवेळी काढा, चहा, नाष्टा, जेवण, सुप व झोपताना गरम दूध दिले जात होते. दररोज दोनवेळा डॉक्‍टर तपासून जात होते. हायड्रोक्‍सिक्‍लोरोक्वीन बरोबरच ॲसिडिटी व अन्न पचनासाठी गोळ्याही देण्यात येत होत्या. 
- रसिका चन्नशेट्टी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Advice from Rasika who overcame Corona Donot panic Be mentally strong