esakal | पुण्यात चहा पेक्षा किटली गरम; पोलिसांकडून रस्ते अडविण्यास सुरवात, पाहा व्हिडिओ
sakal

बोलून बातमी शोधा

pune lockdown preparation police barricading

जीवनावश्‍यक वस्तूंसह विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून नागरिकांची धावपळ सुरू आहे. असे असताना पोलिसांना स्वत:च्या स्तरावर रविवार सकाळपासूनच लॉकडाऊनची तयारी सुरू केली असल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

पुण्यात चहा पेक्षा किटली गरम; पोलिसांकडून रस्ते अडविण्यास सुरवात, पाहा व्हिडिओ

sakal_logo
By
उमेश शेळके

पुणे : सोमवारी (ता.13) रात्री बारा वाजल्यापासून शहरात लॉकडाऊन लागू होणार आहे. त्यास सुमारे तीस तास अवधी असताना पोलिसांनी मात्र रविवारी सकाळपासूनच शहरातील रस्ते बंद करण्यास सुरवात केली. त्यामुळे अनेक नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागला. "पोलिसांना एवढी घाई कसली', "चहा पेक्षा किटली गरम' असा शब्दात नागरिकांकडून संपात व्यक्त करण्यात येत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आणखी वाचा - पुणेकरांनो उद्या दुकानं खुली राहणार, पण....

कोरोना बाधितांची वाढती संख्या विचारात घेऊन पुणे शहर व परिसरात सोमवारी (ता. 13) रात्री बारा वाजल्यापासून लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले. नागरिकांनी पुरेशी तयारी करण्यासाठी वेळ मिळावा, यासाठी तीन दिवस म्हणजे शुक्रवारी प्रशासनाकडून ही घोषणा करण्यात आली. त्यामुळे जीवनावश्‍यक वस्तूंसह विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून नागरिकांची धावपळ सुरू आहे. असे असताना पोलिसांना स्वत:च्या स्तरावर रविवार सकाळपासूनच लॉकडाऊनची तयारी सुरू केली असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. शहराच्या अनेक भागातील गल्लीबोळ आज सकाळपासूनच बॅरीगेट आणि बांबू लावून बंद करण्यात आले. अनेक ठिकाणी रस्ते अडविण्यास सुरूवात करण्यात आली. चौकशी केली असताना पोलिसांकडून आदेश असल्यामुळे हे बंद करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना आवश्‍यक त्या वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध करून दिला असताना पोलिसांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे मात्र अनेकांना अडचणींना तोंड द्यावे लागले. वास्तविक उद्याचा (सोमवार) दिवस देखील असताना पोलिसांनी एवढी घाई करण्यामागे कारण काय, असा सवाल अनेक नागरिकांनी केला.

loading image
go to top