दुग्ध व्यवसायातून आर्थिक  सक्षम झालेले साकोरे कुटुंब

दुग्ध व्यवसायातून आर्थिक  सक्षम झालेले साकोरे कुटुंब

केंदुर हे पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यातील पर्जन्यछायेखालील गाव. शेतीसाठी जेमतेम पाणी उपलब्ध हाेते. पाण्याअभावी शेती पडीक असण्याचे प्रमाणही अधिक आहे. याच गावात बाळासाहेब, श्रीपती व उत्तम हे साकोरे बंधू एकत्रित कुटुंबपद्धतीने राहतात. वडिलांचा देशी गायींचा पारंपरिक व्यवसाय होता. मात्र दुग्ध व्यवसायाला व्यावसायिक स्वरूप देण्याच्या अनुषंगाने या बंधूंनी व्यवस्थापनात सुधारणा करण्यास सुरवात केली. सुमारे १९९५ पासून सातत्य ठेवत व अनुभवातून शिकत या व्यवसायात आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे त्यांना शक्य झाले आहे.

असा आहे साकोरे बंधूंचा व्यवसाय
एका गायीपासून सुरवात. जवळपास सर्वच गायींची गोठ्यात पैदास.
आज दोन म्हशी, १३ संकरित गायी (एएफ), कालवडी आदी सुमारे २५ जनावरे
प्रतिगाय दरराेजचे दूध - १० लिटर 
दरराेजचे एकूण दूध संकलन - १४० लिटर (वर्षभराची सरासरी)
शंभर टक्के उत्पादनात - दररोजचा खर्च - ४० टक्के, उत्पन्न - ६० टक्के 
  
मार्केट व विक्री यंत्रणा 
दुग्ध व्यवसायात आत्मविश्‍वास आल्यानंतर साकाेरे यांनी २००१ मध्ये सहकारी तत्त्वावरील दूध संस्थेची स्थापना केली. टप्प्याटप्प्याने दूध संकलनात वाढ केली. 
आजचे दूध संकलन - सुमारे १५०० लिटर
सर्व दूध शीतकरण यंत्रणेद्वारे संकलन करून पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडे (कात्रज डेअरी) पाठविले जाते. 
साकोरे यांना दुधाला मिळणारा दर - ३० रुपये प्रतिलिटर  
फॅट - ४, एसएनएफ - ८ च्या पुढे. दुधाची उत्तम गुणवत्ता. त्यामुळे दर चांगला मिळतो.
दूध संकलनातून कमिशन मिळते. 
संस्थेला ५० पैसै प्रतिलिटर उत्पन्न मिळते. संस्था पूर्णपणे संगणकीकृत. प्रत्येक शेतकऱ्याला दुधाच्या दर्जाची नाेंद असलेली संगणीकृत पावती दिली     जाते.
अतिरिक्त फायदे 

दरवर्षी सुमारे ७० ते १०० ट्रॉली एवढे शेणखत उपलब्ध. त्याचा शेतीतच वापर. 
दरवर्षी गोठ्यात तीन कालवडी तयार होतात. त्यामुळे दाेन ते तीन वेत झालेल्या गायींची विक्रीही दरवर्षी. प्रतिगायीपासून सुमारे ७० ते ८० हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. अनेक वर्षांत गाय खरेदी केलेली नाही. गोठ्यातच जवळपास सर्व पैदास. या पद्धतीमुळे नवीन गायी गाेठ्यात येतात आणि जुन्या गायींच्या विक्रीतून नफा मिळताे. सध्या आठ ते नऊ कालवडी अाहेत.

अत्याधुनिक गाेठ्याचे स्वप्न 
एक व्यक्तीदेखील गाेठ्याचे व्यवस्थापन करू शकेल अशा संपूर्णपणे स्वयंचलित गाेठ्याचे स्वप्न अाहे. शेण काढण्यासाठीही यंत्राचा वापर करण्यात येईल. 

शंभर टक्के सेंद्रिय शेतीचे नियाेजन 
तीन भावांची मिळून ५० एकर शेती आहे. त्यात सेंद्रिय पद्धतीवर भर दिला आहे. मात्र येत्या काळात गाेमूत्र, शेणखताच वापर वाढवत संपूर्ण शेती शंभर टक्के सेंद्रिय करण्याचा प्रयत्न असल्याचे बाळासाहेब यांनी सांगितले. सध्या १० गुंठ्यांत घरगुती वापरासाठी हिरवी मिरची, टाेमॅटाे, वांगी, भेंडी, गवार, दाेडका, भाेपळा, कारली आदी भाजीपाला सेंद्रिय पद्धतीने घेतला जातो. 

एकूण क्षेत्रापैकी काही डाेंगराळ आहे. ऊस नऊ एकर, मका सहा एकर, सीताफळ १६ एकर, पेरू व आंबा प्रत्येकी एक एकर तर उर्वरित शेती पडीक असून, टप्प्याटप्प्याने विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
 
पुरस्कारांनी सन्मान 
बाळासाहेबांना २००५-०६ चा पुणे जिल्हा सहकारी दूध संघाचा आदर्श दूध उत्पादक पुरस्कार, जिल्हा परिषदेचा २००६-०७ चा आदर्श गाेपालक आणि २०१०-११ चा शेतीनिष्ठ अशा पुरस्कारांनी गाैरविण्यात आले आहे.  

यशाला कारणीभूत जमेच्या बाजू
कुटुंबाचे योगदान 

यशस्वी दुग्ध व्यवसायासाठी गाेठा व्यवस्थापन महत्त्वाचे असते. वेळच्या वेळी आहार, वैद्यकीय काळजी घेतल्यास पशुधन निराेगी राहून दूध उत्पादन चांगले देते, असा साकाेरे कुटुंबाचा अनुभव आहे. 
जबाबदाऱ्या ः
बाळासाहेब व पत्नी चंद्रभागा
श्रीपती व पत्नी जाईबाई 
उत्तम व पत्नी छाया 
कुटुंबातील सहा जण राबत असल्याने बाहेरील मजूरबळ कमी करून त्यावरील खर्च कमी केला आहे. 
छाया व जाईबाई - गाेठ्याची स्वच्छता, चारा देणे
चंद्रभागा - जनावरांचे दूध काढण्यासाठी मोठी मदत 
पहाटे पाच वाजता दिवस सुरू होतो. दिवसभरात एकमेकांचा एकमेकांशी समन्वय साधत गाेठ्याचे व्यवस्थापन  

गाेठ्याची तंत्रशुद्ध बांधणी 
हवा खेळती राहावी, चांगला सूर्यप्रकाश मिळावा यासाठी चारही बाजूंनी विशिष्ट उंचीपर्यंत बांधकाम
गायींना चारा खाण्यासाठी जास्त वाकावे लागू नये यासाठी तीन फूट उंचीवर गव्हाण 
गव्हाणीत पिण्याच्या पाण्याची साेय. त्यामुळे पाण्यासाठी बाहेर साेडण्याची गरज नाही. 
या व्यवस्थेमुळे पाणी देण्याच्या वेळा पाळाव्या लागत नाहीत.
गाेमूत्र वाहून नेण्यासाठी स्वतंत्र पाइपलाइन. गाेमूत्राचे एका टाकीत संकलन.  

आरोग्य  
सुमारे वीस वर्षांच्या अनुभवात गायींच्या आहाराचा पूर्ण अंदाज आला आहे. हालचाली, स्पर्शावरून त्यांच्या आराेग्याचा अंदाज येताे. उदा. पाेटफुगी, ताप. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार घरी आैषधाेपचार. फारच गरज पडली तर पशुवैद्यकांना बाेलावले जाते. 

संतुलित आहार 
सुमारे चार एकरांवर चारापिके. त्यातून अोला चारा दिला जातो. कुट्टी यंत्रही आहे. सुका चाराही घरी बनवला जातो. बाहेरील पशुखाद्यात अधिकाधिक बचत केली जाते. मिनरल मिक्शर, द्रव्य स्वरूपातील आहार, कडबा पेंढी, मका आदींचा वापर. दूध काढण्यासाठी यंत्राचा वापर.  

: बाळासाहेब साकाेरे, ८८८८९०१२९०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com