गडकिल्ल्यांची सफर घडविणारा अवलिया

गडकिल्ल्यांची सफर घडविणारा अवलिया

वाल्हेकरवाडी - दिवाळीसारखा आनंदाचा सण घरी बसून साजरा न करता परिसरातील बालमावळ्यांना सोबत घेऊन गेल्या दोन दशकांपासून किल्ल्याची सफर स्वखर्चातून घडवतोय. या शिवाय किल्ले बनवा स्पर्धेच्या माध्यमातून ते मुलांना आकर्षक बक्षिसेही देतात. अशोक वायकर असे त्या अवलियाचे नाव असून ते आकुर्डी येथील रहिवासी आहेत. 

स्पर्धकांमध्ये इतिहासाबरोबर स्पर्धेची आवड निर्माण व्हावी, यासाठी वायकर हे दरवर्षी नवनवीन किल्ल्यांची सफर घडवतात. तसेच किल्ले बनवा स्पर्धेतील विजेत्या मुलांना ते किल्ल्यावरच बक्षीस वितरण करतात. गेल्या २१ वर्षांपासून अशोक वायकर हे काम अविरतपणे करीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारांचा वारसा पुढील पिढीला कळायला हवा, ही त्यांची तळमळ आहे. आतापर्यंत राजगड, रायगड, शिवनेरी, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, रोहिडा, रायरेश्‍वर, पोवईगड या किल्ल्यांची त्यांनी बाळगोपाळांना सफर घडवली आहे. शिवरायांनी आपल्या मावळ्यांसमवेत ज्या रायरेश्‍वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली होती; त्या रायरेश्‍वर किल्ल्याची सफर या वर्षी मुलांना घडवून आणली. या कामासाठी त्यांची पत्नी सविता वायकर व संपूर्ण कुटुंब दिवाळीत खास परिश्रम घेतात. यात दरवर्षी सुमारे १५० मुले सहभागी होतात. 

 शिवाजी महाराजांचे महान कार्य हे जनसामान्यांत पोचावे, तसेच येणाऱ्या नव्या पिढीला इतिहास माहीत व्हावा, या उद्देशाने किल्ले बनवा स्पर्धा घेतली जाते. त्यातील सहभागी मुलांना दरवर्षी महाराजांच्या एका गडावर घेऊन जात, त्या गडाची संपूर्ण माहिती देऊन त्यांच्या विचारांचा वारसा चालवण्याचा हा प्रयत्न आहे.
- अशोक वायकर, आकुर्डी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com