मराठवाड्यातील ३४ विद्यार्थी बनले सीए

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

सीए, सीपीटीचा निकाल जाहीर; सीपीटी परीक्षेत राशी तोतला प्रथम 

औरंगाबाद - ‘द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटिंग ऑफ इंडिया’तर्फे मे २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाउंटंट आणि सीपीटी या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेचा निकाल मंगळवारी (ता.१८) जाहीर झाला. यात औरंगाबाद विभागातून ३४ विद्यार्थी चार्टर्ड अकाउंटंट बनले; तर सीपीटी परीक्षेत मराठवाड्यातून राशी तोतला हिने १९७ गुण मिळवत प्रथम, तर हर्षल अजमेरा यांनी द्वितीय क्रमांक मिळवला, अशी माहिती औरंगाबाद सीए शाखेचे अध्यक्ष सीए अल्केश रावका यांनी दिली.

औरंगाबाद विभागातून सीए अंतिम वर्षांसाठी ग्रुप एकमध्ये २२२, ग्रुप दोनमध्ये १६० आणि बोथ ग्रुपमध्ये १२५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
 यापैकी प्रथम ग्रुपमध्ये एकूण ४६ विद्यार्थी, दुसऱ्या ग्रुपमध्ये ३८ आणि बोथ ग्रुपमध्ये १२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये एकूण ३४ विद्यार्थी चार्टर्ड अकाउंटंट बनलेत. 

हे आहेत मराठवाड्यातील सीए
समीक्षा येरावार, प्रणव राठी, सारंग राठी, प्रियंका तोतल, रिषम मुंदडा, गुरशिन बिंद्रा, श्रेलंय बागी, साक्षी आग्रवाल, तानिया अग्रवाल, श्‍वेता झंवर, शिवांग शर्मा, बद्री तोष्णीवाल, प्रियंका व्यास, श्रेयश राठी, श्रेयश अग्रवाल, गौरी पंडित, वैजनाथ धिडे, पूजा माने, ललिता खिवंसरा, पूजा मुथ्था, समृद्धी तुनावंत, रविना कछवा, सूरज कुमार सोमाणी, खुशबू काबरा, आशिष लाहाेटी, अश्‍विनी सोनी, सागर काला, सोहम कोटक, दिव्या रामकृष्णन, सुमाली पाटणी, कस्तुरी जोशी, निशा चव्हाण, पारस आहीर, सबिना कुमार, गुरू साहिल पोकर्णा यांचा समावेश आहे. 

सीपीटीत ३३७ विद्यार्थी उत्तीर्ण 
औरंगाबाद विभागातील ९२७ विद्यार्थ्यांनी सीपीटी दिली होती. त्यापैकी ३३७ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. यात औरंगाबादच्या राशी तोतलाने २०० पैकी १९७ गुण मिळवत मराठवाड्यातून पहिली आली आहे. 

त्यापाठोपाठ हर्षल अजमेरा यांनी १९४ गुण मिळवत दुसरा क्रमांक मिळवला आहे. निधी देवीदान उत्तीर्ण झाली आहेत, असेही सीए अल्केश रावका यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aurangabad marathwada news 34 student ca