आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मदतीचा हात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - अभियंता दिनाच्या निमित्ताने कनिष्ठ अभियंता संघटना व पतसंस्थेतर्फे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाच कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यात आली. त्याचप्रमाणे नेत्रदान संकल्प व रक्‍तदान शिबिर घेण्यात आले. 
डॉ. विश्‍वेश्‍वरय्या यांच्या जयंतीनिमित्त कनिष्ठ अभियंता संघटना व कनिष्ठ अभियंता सहकारी पतसंस्थेतर्फे सिंचन भवन येथे हा कार्यक्रम घेण्यात आला.

महसूल विभागाने शिफारस केलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाच वारसांची निवड करून त्यांना पन्नास हजार रुपयांच्या मुदतीचे मुदत ठेव प्रमाणपत्र देण्यात आले. रक्तदान शिबिरात चाळीस जणांनी उत्स्फूर्त रक्तदान केले. त्याचप्रमाणे नेत्रदान संकल्प अर्ज या वेळी भरून घेण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्‌घाटन मुख्य अभियंता एम. एस. सुरकुटवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता अ. प्र. कोहीकर, व्ही. टी. तांदळे, कनिष्ठ अभियंता संघटनेचे राज्य अध्यक्ष जयवंतराव गायकवाड, व्ही. एम. देवराज, ए. बी. चव्हाण, ए. एस. मेहेत्रे, प्रफुल्ल गुंडरे, एस. पी. भर्गोदेव, डी. डी. शिंदे, श्री. सोहोनी, अनिल निंभोरे, श्री. फुलारी यांची उपस्थिती होती. जयवंतराव गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.

पतसंस्थेचे उपाध्यक्ष रमेश चव्हाण यांनी पतसंस्थेची माहिती दिली. रमेश चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. एम. सी. सय्यद यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी सुमंत देशमुख, एम. सी. सय्यद, सुनील गोडबोले, रवींद्र काकडे, चंद्रकांत डोणगावकर, राजन खापर्डे, एस. डी. वैद्य, एम. आर. जाधव, एम. बी. राठोड, हनुमंते यांनी प्रयत्न केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aurangabad marathwada news help to suicide affected farmer family