औरंगाबाद: दोन हजार डॉक्टरांचा अवयवदान संकल्प

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

औरंगाबाद : महा अवयवदान जनजागृती अभियानांतर्गत आज (मंगळवार) सकाळी आठ वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून जनजागरण रॅलीला सुरवात झाली. अतिशय शिस्तीत निघालेली रॅली दोन किलोमीटर पेक्षा जास्त लांबीची होती. यामध्ये दोन हजार डॉक्टर्स, परिचारिका व शहरातील विविध महाविदयालायतील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. रॅलीत सहभागी सर्वांनी अवयवदानाचा संकल्प केला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरातून रॅलीस परिसरातून सुरू झालेल्या रॅलीचा औरंगपुरा, गुलमंडी, पैठण गेट मार्गे क्रांतीचौक येथे समारोप झाला. अधिष्ठाता डॉ. कनन येळीकर,अधिष्ठाता डॉ एस पी डांगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गोवर्धन गायकवाड, डॉ. शिवाजी सुक्रे, डॉ सुधीर चौधरी, यांच्यासह रॅलीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील अध्यापक, अधिकारी, कर्मचारी, शासकीय दंत महाविद्यालय, सीएसएमएसएस दंत व आयुर्वेद महाविद्यालय, भगवान होमिओपॅथी महाविद्यालय, डीकेएमएम होमीओपॅथी महाविद्यालय, शिवा ट्रस्ट, शासकीय परिचारिका प्रशिक्षण केंद्र, आरोग्य सेवा विभाग यासह अन्य संस्थाचा रॅलीत सहभाग होता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aurangabad news Resolution of organisation of two thousand doctors