मित्राच्या वाढदिवसाचा खर्च टाळून रस्‍त्‍यावरील बुजविले खड्डे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

कायगाव - गंगापूर तालुक्‍यातील अंमळनेर येथील धर्मवीर संभाजी राजे युवा मंचच्या ११० युवकांनी एकत्र येत त्यांच्या मित्राच्या वाढदिवसाचा केक, पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ, फटाके, डिजिटल बॅनर, जेवण इत्यादींचा खर्च टाळून पावसामुळे जागोजागी उखडलेल्या चार किलोमीटर रस्त्यावरील खड्डे स्वखर्चाने बुजवून मित्रास वाढदिवसाची अनोखी भेट दिली.  

औरंगाबाद-नगर राष्ट्रीय महामार्गापासून रमेश मिसाळ पाटील वस्ती, अमळनेर वस्ती, जुने लखमापूरकडे जाणाऱ्या चार किलोमीटर अंतरावरील रस्ता पावसामुळे प्रचंड खराब झाला होता. हा रस्ता काटेरी झुडुपांनी व्यापून गेला होता. 

दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनचरित्रावर ‘मेरे मन की कल्पनाएँ’ या कवितासंग्रहाचे कवी जमील पठाण यांचा बुधवारी (ता. एक) वाढदिवस साध्या पध्दतीने साजरा करण्याचे धर्मवीर संभाजी राजे युवा मंचच्या ११० युवकांनी ठरविले. या वाढदिवसाचा खर्च टाळून औरंगाबाद नगर-राष्ट्रीय महामार्ग ते अंमळनेर वस्ती, जुने लखमापूर, रमेश मिसाळ वस्ती या तीन ठिकाणच्या उखडलेल्या रस्त्यावर जेसीबी यंत्राच्या साह्याने रस्त्याची डागडुजी करून शेतकरी-ग्रामस्थांना रस्त्याची सोय करून देण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांचा ऊस साखर कारखान्यास जाण्यास मोठी सोय झाली आहे. हा अभिनव उपक्रम राबविण्यासाठी अंमळनेर येथील 

धर्मवीर संभाजी राजे युवा मंचचे शिवाजी मिसाळ, राधेश्‍याम कोल्हे, शुभम उगले, अक्रम पठाण, संजय पंडित, राजूभाई पठाण, राजेश मिसाळ, कृष्णा मिसाळ, गोपी मिसाळ, शुभम सोनवणे, प्रशांत गवळी, अतिक पटेल, श्रीकांत दगडे, नितीन चित्ते, भाऊराव डुबे, रोहित बिरुटे, रवी मिसाळ, संतोष गायकवाड, राजेंद्र रोकडे, विठ्ठल कान्हे, ताहेर पठाण, हकीम पठाण, सागर मिसाळ, संतोष साळवे आदी युवकांनी पुढाकार घेऊन रस्त्याची दुरुस्ती केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: beed news friend birthday potholes