esakal | टाकाऊ वस्तूंपासून उबदार घरटी
sakal

बोलून बातमी शोधा

टाकाऊ वस्तूंपासून उबदार घरटी

सांगली - सिमेंटच्या जंगलात हरवून जाण्यापेक्षा खरेखुरे जंगल घराभोवती असावे, या विचाराने मिरजेतील सैनिक वसाहतीत राहुल पवार यांच्या कुटुंबीयांनी घराभोवती झाडी लावली. राहुलचा भाचा हर्ष भोसलेला पक्ष्यांची आवड आहे. त्यांनी टाकाऊ वस्तूंचा उपयोग करून पक्षांसाठी घरटी बनवली. दाणा-पाण्याची सोय केली. पक्षांचा किलबिलाट इतका आहे, की सारे कुटुंबीय हरवून जाते. 

टाकाऊ वस्तूंपासून उबदार घरटी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली - सिमेंटच्या जंगलात हरवून जाण्यापेक्षा खरेखुरे जंगल घराभोवती असावे, या विचाराने मिरजेतील सैनिक वसाहतीत राहुल पवार यांच्या कुटुंबीयांनी घराभोवती झाडी लावली. राहुलचा भाचा हर्ष भोसलेला पक्ष्यांची आवड आहे. त्यांनी टाकाऊ वस्तूंचा उपयोग करून पक्षांसाठी घरटी बनवली. दाणा-पाण्याची सोय केली. पक्षांचा किलबिलाट इतका आहे, की सारे कुटुंबीय हरवून जाते. 

राहुल पवार बीबीए शिकला. भाचा हर्ष भोसलेला पक्ष्यांची आवड. सारे कुटुंब पक्षांत रमते. राहुलच्या मित्राच्या शेतात भोपळा पिकतो. तेथील  भोपळा आणला, घरट्यासारखा आकार दिला. गवत  भरले. शीतपेयांच्या बाटल्या कापल्या. रंग दिला.  नारळाचे केसर भरले. तारेने झाडाला बांधले. दोन्ही प्रकरची घरटी पक्ष्यांनाही आवडली. घराच्या परिसरात सात घरटी केली आहेत. तीन घरट्यांत पक्ष्यांनी घरोबा केला आहे. चिमण्यांनी अंडी घातली, तयातून पिले बाहेर पडली. पिलांचा आवाज येतो. चिमणी आणि बुलबुलची संख्या अधिक आहे. 

‘‘घराभोवती जास्वंद, फणस, पेरू, लिंबूची झाडे  आहेत. पिलांना तांदूळ घालतो. सीताफळाचे झाड आहे. एकही सीताफळ तोडत नाही, चिमण्यांच ताव मारतात. अंजीरही चिमण्यांना आवडते. पेरूच्या झाडावरही त्यांचा मुक्काम आहे.  त्यांना खाण्यापिण्यास मुबलक सोय केली, असे हर्षने सांगितले. नळाच्या पाईपला थोडेसे लिकेज ठेवले. चिमण्या आंघोळ करतात. ते पाहणे आनंददायी आहे.’’

- राहूल पवार

loading image