सौरऊर्जेद्वारे स्वतःसह कंपनीलाही वीज

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

नाणेकरवाडीतील शेतकऱ्याने भरमसाट वीज बिलाला वैतागून उभारला प्रकल्प

चाकण - नाणेकरवाडी (ता. खेड) येथील दिनकर नाणेकर या शेतकऱ्याने वीज बिल अधिक येत असल्याच्या कारणाला वैतागून त्याच्या स्वतःच्या इमारतीच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारला व त्यासोबत सोलर नेट मिटरिंग हे उपकरणही बसवले. यासाठी त्यांना आठ लाख रुपये खर्च आला. या प्रकल्पामुळे अठ्ठावन्न खोल्यांना वीज मिळत असून, एक वीजपंपही सुरू आहे. बिलाची बचत होऊन कंपनीलाही वीजपुरवठा होत आहे, अशी माहिती दिनकर नाणेकर यांनी दिली.

दिनकर नाणेकर यांनी त्यांच्या चार मजली इमारतीत अठ्ठावन्न भाड्याच्या खोल्या बांधल्या आहेत. या खोल्यांचे दोन महिन्यांना हजारो रुपयांचे बिल येत होते. बिल भरले नाही, तर ते लाखो रुपयांवर जायचे. त्यामुळे वैतागून त्यांनी सौर ऊर्जा प्रकल्प उभारून त्यासोबत सोलर नेट मीटरिंग उपकरण बसवायचे असे ठरविले. इमारतीच्या छतावर सोलर पॅनेल व इतर साहित्य बसविण्यात आले. ऊन अधिक असेल, तर अधिक युनिट वीज मिळते. त्यांनी या प्रकल्पासाठी वीज कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांची परवानगी घेतली आहे.

आता कंपनीलाही वीज मिळत आहे. त्यामुळे जेवढी वीज मिळते तेवढी कंपनी घेते. त्यांच्या बिलातून ही रक्कम वजा केली जाते. शिवाय सोलर नेट मिटरिंगमुळे कंपनीला किती वीज मिळाली व नाणेकर यांनी किती वापरली हेही कळत आहे, असे वीज कंपनीचे सहायक अभियंता मदन मुळूक यांनी सांगितले. 
 
दहा किलोवॉट क्षमतेचा प्रकल्प
दोन महिन्यांपासून हा प्रकल्प सुरू केला असून, याची क्षमता दहा किलोवॉटइतकी आहे. वीजपंप व अठ्ठावन्न खोल्यांचे येणारे भरमसाट वीज बिल भरून मी थकलो होतो. आता हा आठ लाख रुपयांचा प्रकल्प राबविल्याने मला तर वीज वापरायला मिळतेच, शिवाय अधिकची वीज मी कंपनीलाही पुरवतो. या प्रकल्पामुळे वीजपुरवठा सुरळीत होत आहे, असे नाणेकर म्हणाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chakan news The company also has power through solar power itself