गरिबीवर मात करून छाया जैन बनली ‘सीए’

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 January 2020

सनदी लेखापाल परीक्षेत यशस्वी होण्यासाठी घरची आर्थिक परिस्थिती सधन असली पाहिजे, असे नाही. सातत्यपूर्ण अभ्यास आणि कष्ट करण्याची तयारी असल्यास पहिल्याच प्रयत्नात यश मिळविता येते, असा मापदंड पुण्यातील छाया नरेश जैन या विद्यार्थिनीने  प्रस्थापित केला.

पुणे - सनदी लेखापाल परीक्षेत यशस्वी होण्यासाठी घरची आर्थिक परिस्थिती सधन असली पाहिजे, असे नाही. सातत्यपूर्ण अभ्यास आणि कष्ट करण्याची तयारी असल्यास पहिल्याच प्रयत्नात यश मिळविता येते, असा मापदंड पुण्यातील छाया नरेश जैन या विद्यार्थिनीने  प्रस्थापित केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वडिलांच्या निधनानंतर मागील पंधरा वर्षांपासून छायाची आई सुशीला जैन लहानशा टपरीमध्ये झेरॉक्‍स व्यवसायावर कुटुंबाचे पालन पोषण करीत आहे. गरिबीमुळे मोकळ्या वेळेत दुकान सांभाळण्याचे कामही छाया करते. ती म्हणते, ‘‘माझ्या दोन चुलत बहिणी सीए झालेल्या आहेत. मीसुद्धा दहावीत असतानाच सीए होण्याचे स्वप्न बघितले. त्यादृष्टीने वाणिज्य शाखेत शिक्षण घेतले. सीए बनण्यासाठी पैसे कमी आणि कष्ट जास्त लागतात; म्हणून मी सीएचा अभ्यास मन लावून केला.’’ तिच्या या स्वप्नपूर्तीसाठी भाऊ राकेश आणि बहीण मनीषा यांनी मोलाची मदत केली. 

पुस्तके, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कासाठी कुटुंबाने कधीच हात आखडता घेतला नाही. परीक्षेच्या कालावधीत छायाला अभ्यासासाठी जास्त वेळ कसा मिळेल, याची काळजी सर्वांनी घेतली. जसा वेळ मिळेल तसा अभ्यास छायाने केला. सातत्यपूर्ण कष्ट हीच यशाची गुरुकिल्ली असल्याचे ती म्हणते.     

आमच्या घरात एवढे उच्चशिक्षित कोणीच नाही. छायाने जीवनात वेगळे काही करावे, अशी तिच्या वडिलांची इच्छा होती. सीएच्या परीक्षेत यश मिळून तिने ती पूर्ण केली, याचे आम्हाला समाधान आहे.
- सुशीला जैन, छायाची आई


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chhaya jain became CA

Tags
टॉपिकस
Topic Tags: