विद्यार्थिनींनी तयार केल्या जवानांसाठी दोन हजार राख्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

लायनेस क्‍लबचा उपक्रम - संदेश पत्रांचाही समावेश; ३५ शाळांना आवाहन 

चिपळूण - देशरक्षणासाठी सीमेवर लढणाऱ्या जवानांना रक्षाबंधनासाठी घरी जात येत नाही. त्यामुळे तालुक्‍यातील ३५ शाळेतील सुमारे २ हजार विद्यार्थिनींनी जवानांसाठी स्वमेहनतीने राख्या बनविल्या आहेत. संदेश पत्र लिहिली आहेत. येथील लायनेस क्‍लबच्या महिला पदाधिकाऱ्यांनी हा उपक्रम राबवला. संदेश पत्रातून शालेय विद्यार्थिनींनी दिलेला संदेशाने आम्हीदेखील भावूक झालो, असे लायनेसच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

नियमितपणे विविध सामाजिक, शैक्षणिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेला लायन्स क्‍लब शताब्दी वर्ष साजरे करीत आहे. अंगीकृत असलेला लायनेस क्‍लब २७ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. या पार्श्‍वभूमीवर या वर्षी विशेष उपक्रम राबविल्याचे लायनेसच्या अध्यक्षा सौ. सुप्रिया गुरव यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, सीमेवर लढणारे जवान प्रसंगी देशवासीयांसाठी आपल्या प्राणांची आहुती देतात. त्यांच्यामुळेच आपण देशात सुरक्षित राहू शकतो. शालेय विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची जागृती व्हावी, त्यांना जवानांच्या कार्याचे मोल समजावे म्हणून जवानांना राख्या आणि संदेश पत्र देण्याचा उपक्रम हाती घेतला. त्यासाठी शहर व परिसरातील ३५ शाळांना आवाहन केले. शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी चांगला प्रतिसाद दिल्याने २ हजार राख्या व संदेश पत्र संकलित झाली. बहुतांशी विद्यार्थिनींनी स्वत:हून राख्या बनविल्या आहेत. आपल्या भावाला पत्र लिहिल्यासारखेच संदेश लिहिले आहेत. जवानांप्रती असलेली आत्मीयता, प्रेम, आपुलकी आणि कृतज्ञता राखी व संदेशपत्रातून व्यक्त होत आहे. राख्या व संदेश पत्र तयार करण्यासाठी विद्यार्थिनींनी मेहनत घेतली. संबंधित शाळेतील शिक्षकांनीही या विद्यार्थिनींना योग्य मार्गदर्शन केले. संकलित झालेल्या राख्या व संदेश पत्र लायनेसच्या माध्यमातून जवानांना सुरक्षितपणे पाठवले जाणार आहे. त्यासाठी येथील एअर मार्शल हेमंत भागवत यांनीही सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले आहे. येथील माजी सैनिक संघटनेचे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या राख्या पाठवल्या जाणार आहेत. 

विद्यार्थिनींचे लायनेसच्या वतीने आभार मानण्यात आले. विद्यार्थिनींनी तयार केलेले शुभसंदेश सादर केले. पत्रकार परिषदेस लायनेसच्या अध्यक्षा सौ. सुप्रिया गुरव, सौ. ज्योती पेंडसे, सौ. प्राची जोशी, सौ. उषा लिमये, सौ. सीमा चाळके, सौ. अंजली कदम, सौ. रविना गुजर, सौ. तनिज मुल्ला आदी उपस्थित होत्या.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chiplun konkan news girl student 200 rakhi making for jawan