स्वखर्चातून जपली वाचन संस्कृती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जून 2019

कोल्हापूर - एखादे सामाजिक काम करायचेच म्हटले, तर त्याला पैशाची किंवा कुणाच्या पाठिंब्याची गरज लागत नाही हेच कसबा बावडा येथील किशोर गुरव यांनी दाखवून दिले आहे. वाचन संस्कृती वाढावी यासाठी किशोर यांनी स्वखर्चातून घरीच वाचनालय सुरू केले आहे. आज त्यांच्याकडे ३४०० पुस्तकांचा खजिना आहे, तर १२० सभासद त्याचा लाभ घेतात. 

कोल्हापूर - एखादे सामाजिक काम करायचेच म्हटले, तर त्याला पैशाची किंवा कुणाच्या पाठिंब्याची गरज लागत नाही हेच कसबा बावडा येथील किशोर गुरव यांनी दाखवून दिले आहे. वाचन संस्कृती वाढावी यासाठी किशोर यांनी स्वखर्चातून घरीच वाचनालय सुरू केले आहे. आज त्यांच्याकडे ३४०० पुस्तकांचा खजिना आहे, तर १२० सभासद त्याचा लाभ घेतात. 

कुणाच्याही मदतीशिवाय महिन्यातून किमान दोन ते तीन हजार रुपयांची पुस्तके ते खरेदी करतात. आपला मोठा भाऊ (कै.) अनिल गुरव यांच्या प्रेरणेने त्यांनी या वाचनालयाची स्थापना केली. कुणाची वाचनाची आवड लोप पाऊ नये, चांगले व्यक्तिमत्त्व घडण्यात आपला वाटा असावा हा त्यामागचा उद्देश आहे.

किशोर यांनाही वाचनाची आवड आहे. ते स्वतः प्रशासकीय सेवा परीक्षांची तयारी करत होते, त्यावेळी त्यांना ही पुस्तके उपलब्ध झाली नाहीत. आपल्यासारखी अशा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्यांची गैरसोय होऊ नये, म्हणून या अभ्यासक्रमाची पुस्तके उपलब्ध व्हावी यासाठी त्यांचे प्रयत्न 
सुरू आहेत.

ऐतिहासिक कादंबरी विश्वकोश अनुवादित ललित गद्य कवितासंग्रह गोष्टींची पुस्तके विविध अखंड सामान्यज्ञान एमपीएससीची पुस्तके दुर्मिळ पुस्तके इत्यादी त्यांच्या वाचनालयात उपलब्ध आहेत. या वाचनालयाच्या माध्यमातून यासाठी जेवढे करता येईल तेवढे करायचं आहे हे सगळे चांगल्या माणसांमुळे आणि चांगल्या माणसांचा ती सुरू आहे.

व. पु. काळे, बाबा कदम, उत्तम कांबळे, आचार्य अत्रे यांच्या पुस्तकांना मोठी मागणी आहे, असे त्यांनी सांगितले. उच्चशिक्षण घेणाऱ्या वकील, डॉक्‍टर, इंजिनिअर यांनाही घरपोच सेवा दिली जाते. स्वतःचे काम करत ते वाचनालय चालवतात. गेली पाच वर्षे या वाचनालयाला त्यांनी कुलूप घातले नाही.  मात्र यामुळे तिथून एकही पुस्तक चोरीला गेले नाही. 

अगदी कमी पैशातही वाचनालयाची सुरवात केली आहे. माझ्या योगदानाने समाजातील एक-दोन चांगली माणसे घडणार असतील, तर यापेक्षा मोठा आनंद दुसरा नाही. बाकीच्या विद्यार्थ्यांना विनाशुल्क अभ्यासिका उपलब्ध करून देण्याचा मानस असून यासाठी लागेल ते प्रयत्न करण्याची तयारी आहे. 
- किशोर गुरव,
ग्रंथपाल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: conservation of Reading Culture Kishor Gurav story